शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर्ज माफ करुन वन पोल वन डिपी उपक्रमात शेतकऱ्यांना सामील कराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात वनपोल वन डीपी या उपक्रमात थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना सामावून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात वनपोल वन डीपी या उपक्रमात थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़ या योजनेची व्याप्ती वाढवून उर्वरित शेतकºयांनाही वीज जोडणी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे़शहादा विभागात तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि शहादा या चार तालुक्यांमध्ये २७ हजार ५०० कृषीपंपधारक शेतकरी आहेत़ या शेतकºयांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या आहेत़ अनेक महिन्यांपासून वीज पुरवठा कमी अधिक प्रमाणात होत असल्याने शेतकºयांचे सबमर्सिबल पंप जळून नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़ यावर पर्याय म्हणून शासनाने वन पोल वन डिपी हा उपक्रम सुरु केला आहे़ परंतू यात शहादा विभागातून केवळ १ हजार २०० शेतकºयांना जोडण्या देण्यात आल्या आहेत़ या जोडण्या वाढवण्याची कारवाई करण्याची मागणी शेतकºयांची आहे़ परंतू अद्याप मंजूर करण्यात आलेल्या १ हजार २०० शेतकºयांनाही वीज पुरवठा पूर्णपणे होत नसल्याचे सुरु आहे़ यातून मग शेतकºयांच्या अडचणी वाढत आहे़ वन पोल वन डीपी उपक्रमामुळे निर्धारित आणि सुरक्षित वीज पुरवठा होणार असल्याने शेतकºयांना पिकांना सुरळीतपणे पाणी देणे शक्य होऊन वीज बचत होणार आहे़ यातून थकबाकीची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याने विभागाने तातडीने हे काम वाढवण्याची मागणी आहे़याबाबत वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता किसन पावरा यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी वन पोल या योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे़ नवीन लाभार्थींबाबत शासनाने आदेश केल्यानंतर कामकाज पूर्ण करणार असल्याची माहिती दिली आहे़दरम्यान चारही तालुक्यात थकबाकीदार शेतकºयांची संख्या मोठी आहे़ बहुतांश शेतकºयांचे बिल हे पाच ते १० हजारापेक्षा अधिक नसल्याने ते माफ करुन नवीन जोडणी ूदेण्याची गरज आहे़ गेल्या काही वर्षात शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या नुकसानीमुळे किरकोळ स्वरुपाचे बिल वजा करुन नवीन सुरुवात करण्याची मागणी चारही तालुक्यातून जोर धरत आहे़