शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागातर्फे १२ लाखाचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : २१ आॅगस्ट रोजीच्या दाखल वन गुन्ह्यातील फरार वाहन वन विभागाने नवापूर पोलिसांच्या मदतीने आज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : २१ आॅगस्ट रोजीच्या दाखल वन गुन्ह्यातील फरार वाहन वन विभागाने नवापूर पोलिसांच्या मदतीने आज मोठ्या बंदोबस्तात जामतलाव येथून ताब्यात घेतले. या कारवाईत मशिन व ताज्या तोडीचे साग चौपाट नग असा सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कारवाईवेळी जामतलाव गावाला छावणीचे स्वरूप आले होते.शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वनरक्षक बोरझर यांचेकडील २१ आॅगस्ट रोजीच्या प्रथम रिपोर्ट क्रमांक १० मधील फरार वाहन, अवैध मुद्देमाल व रंधा मशिन जप्त करण्यासाठी वन विभागाचा फौज फाटा व पोलीस जामतलाव गावात दाखल झालेत.गुन्ह्यातील संशयित इसमास अटक करणेसाठी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांचे समवेत नंदुरबार वनविभाग मधील वनक्षेत्र नवापूर, चिंचपाडा, खांडबारा, शहादा, नंदुरबार, काकडदा, फिरते पथक शहादा तसेच धुळे वनविभाग मधील वनक्षेत्र कोंडाईबारी व पिंपळनेर मधील सर्व वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांचा फौज फाटा मौजे जामतलाव गावात धडकला. संशयिताच्या घराची व परिसराची सर्च वारंटने झडती घेतली असता संशयित फरार झाल्याने घटनास्थळी दिसून आला नाही. घरात रंधा मशिन, डिझाईन मशिन, पाया उतार मशिन, डिझेल इंजिन व ताज्या तोडीचे साग चौपाट सहा नग मिळाले. घराचे दोन्ही बाजूस फरार असलेले लाल रंगाचे वाहन व पांढऱ्या रंगाचे अन्य वाहन अशी दोन वाहने आढळून आली.वन विभागाने दोन्ही वाहन मुद्देमाल व यंत्र सामुग्री नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जप्त केले. जप्त वाहन व मुद्देमालाची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे. वन विभागाच्या विविध कार्यालयांच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नवापूर व वन कर्मचारी करित आहेत.नवापूर तालुक्यात वेळोवेळी अवैध लाकूड तोड आणि लाकूड साठा प्रकरणी वन विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूडचा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.