शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

फेसरिडींगद्वारे शिक्षकांच्या उपस्थितीवर राहणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती तपासणीसाठी आता अशा ठिकाणी बायोमेट्रीक व फेसरिडींग हजेरी घेतली जाणार आहे. अशा शाळा या जीपीएसद्वारे मुख्यालयाला जोडल्या जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे दुर्गम भागातील शाळा नियमित सुरू राहणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, दुर्गम भागात कनेक्टीव्हिटीची अडचण लक्षात घेता हा उपक्रम कितपत यशस्वी होईल हा प्रश्नच आहे.नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती व शाळा नियमित भरण्यासंदर्भात नेहमीच ओरड होत असते. त्यामुळे शिक्षकांच्या नियमित उपस्थिती बाबत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा फारसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. आता त्यावर आणखी एक उपाय म्हणून बायोमेट्रीक व फेसरिडींग सुरू करण्यात येणार आहे.वाढत्या तक्रारींची दखलदुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत नेहमीच तक्रारी होत आहेत. जिल्हा परिषदांच्या सभांमध्ये देखील याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित होत असतो. त्याला उत्तर देतांना अधिकारीही संभ्रमात असतात. ही समस्या कायम स्वरूपी मिटावी, तक्रारी कमी व्हाव्या, शिक्षक नियमित शाळांवर उपस्थित राहावेत यासाठी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे.यासाठी प्रत्येक शाळेवर बायोमेट्रीक किंवा फेसरिडींग उपकरण बसविले जाणार आहे. त्याद्वारे हजेरी नोंदविण्यात येणार आहे. हे उपकरण जीपीएस सिस्टिमद्वारे थेट मुख्यालयाला किंवा तालुका गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला जोडले जाणार आहे. त्याद्वारे शिक्षकांची हजेरी तपासली जाणार आहे. या उपक्रमाला सुरुवात होण्यास पुढील शैक्षणिक वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.कनेक्टिीव्हटीची समस्यादुर्गम भागात साध्या मोबाईलची रेंज राहत नाही अशा ठिकाणी जीपीएस सिस्टिम कशी काम करणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण विभागाकडे काय उपाययोजना आहेत याबाबत मात्र अनभिज्ञता कायम आहे.अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी आश्रमशाळांमध्ये करण्यात आला होता. परंतु अवघ्या महिनाभरात आश्रम शाळांमधील बायोमेट्रीक उपकरण बंद पडले होते. ते कसे बंद पडले हा त्यावेळी संशोधनाचा विषय ठरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात येणारे बायोमेट्रीक व फेसरिडींग मशीन देखील किती दिवस चालतील याबाबतची उत्सूकता देखील कायम आहेच.दुर्गम भागातील अनेक शाळांना इमारती नाहीत, वीज पुरवठा नाही अशा ठिकाणी फेसरिडींग व बायोमेट्रीक यंत्र कसे काम करेल हा मोठा प्रश्न आहे. शिवाय मोबाईल टॉवर दोन ते तीन दिवस बंद असतात. त्यामुळे जीपीएस सिस्टिम कसे काम करेल ही शंकाच आहे.शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, जीपीएस सिस्टिमसाठी कनेक्टिीव्हीटी गजर राहणार नाही. संबधीत शिक्षक संबधीत वेळेत त्या क्षेत्राच्या बाहेर गेला तर त्याची गैरहजेरी नोंदविली जाणार आहे. परंतु ही यंत्रणा कशी काम करेल हे शिक्षण विभागाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.