शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील हॉटस्पॉटवर केले गेले लक्ष केंद्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रेड झोनमध्ये गेल्यानंतर प्रशासनाने उपाययोजनांना गती दिली आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहादा शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रेड झोनमध्ये गेल्यानंतर प्रशासनाने उपाययोजनांना गती दिली आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या शहादा शहरातील हॉटस्पॉट तयार करून त्यादृष्टीने त्या भागात उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. २५ हजारापेक्षा अधीक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, अद्यापही १०८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवालाची प्रतिक्षा आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १७ पर्यंत गेली आहे. त्यातील एकाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथेच रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील आयशोलेश कक्षात उपचार सुरू आहेत. त्यातील अनेकांची प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचे आता पुन्हा नव्याने स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. सलग दोन स्वॅब निगेटिव्ह आले तर त्यांना रुग्णालयातून घरी जावू देण्यात येणार आहे.हॉटस्पॉटवर लक्षशहादा येथे सर्वाधिक नऊ रुग्ण सापडल्याने शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या प्रभाग चार मध्ये उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. येथे आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहिल्यास मयत रुग्णाच्या घरातील दोन, दुसऱ्या एका कुटूंबातील चार तर एका खाजगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहाद्यातील प्रभाग चारवर सध्या लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याशिवाय या परिसरातील अर्धा ते एक किलोमिटर परिसरातील वसाहतींना बफर झोनमध्ये टाकून त्या भागात देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत १५ पेक्षा अधीक वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. २५ हजारापेक्षा अधीक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सर्व्हेक्षण देखील करण्यात येत आहे.नंदुरबारकर होताय रिलॅक्सजिल्ह्यात सर्वात पहिला कोरोनाचा रुग्ण नंदुरबारात सापडला होता. त्याच्या संपर्कातील परंतु त्यांच्याच घरातील इतर तीन जणांना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यावर चौघांवर आयशोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काहींचे स्वॅब देखील घेण्यात आले होते. परंतु ते सर्व निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.संपर्कातील सर्वांनाच विलगीकरण कक्षात किंवा घरातच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचीही पुन्हा एकदा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. असे असले तरी शहरवासीयांना आवश्यक त्या सर्व सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांवर भर द्यावा. लॉकडाऊनचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा, विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील यापूर्वीच प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.अक्कलकुवातही दक्षताअक्कलकुवा येथेही दक्षता घेतली जात आहे. येथेही चार रुग्ण निष्पन्न झाले आहेत. याशिवाय गुजरातमधून येणाऱ्यांची संख्या कायम असल्यामुळे शहरात विशेष सतर्कता बाळगली जात आहे. संपुर्ण लॉकडाऊनला शहरवासीयांना चांगला प्रतिसाद दिला आहे. असे असले तरी आणखी काही दिवस प्रत्येकाने उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, एकमेकांच्या संपर्कात येवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर आणि त्यांच्या आरोग्य तपासणीवर सध्या लक्षा केंद्रीत करण्यात आले आहे. अक्कलकुवा येथे नव्याने आढळून आलेला रुग्णवाहिकेचा चालका संपर्क कुठे कुठे आला होता त्याचा शोध घेवून संबधितांना ट्रेस केले जात आहे. याशिवाय शहादा येथील खाजगी दवाखान्यातील संबधीत महिला कर्मचाºयाच्या संपर्कातील व्यक्ती आणि एकाच घरातील चार जणांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे