शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातून आलेले पाच जण निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : परदेशातून भारतात प्रवास करुन आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरातील होळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परदेशातून भारतात प्रवास करुन आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने शहरातील होळ तर्फे हवेली शिवारातील विद्यार्थिनी वसतीगृहात विलगीकरण कक्ष तयार केला आहे़ या कक्षात मंगळवारी सकाळपासून पाच नागरिकांना दाखल करण्यात आले आहे़जिल्हा सामान्य रुग्णालयात दक्षता म्हणून तयार करण्यात कोरोना विलगीकरण कक्षात तपासण्या करुन आतापर्यंत ३० जणांची तपासणी करण्यात आली होती़ यापैकी १० जणांचे नमुने हे तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेकडे देण्यात आले होते़ हे सर्व आठ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर उर्वरित तीन नमुन्यांच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा आहे़ तत्पूर्वी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची माहिती घेण्यात आली होती़ यातील केवळ परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यांतर्गत आतापर्यंत पाच जण वसतीगृहात तयार केलेल्या कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आहे़ अमेरिका आणि युरोपिय देशांमधून आलेल्या या नागरिकांना केवळ निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ त्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याची माहिती आहे़ आरोग्य विभागाने शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव आणि नवापुर येथे वसतीगृह, आश्रमशाळा आणि ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना केली असून हे कक्ष उपचारांसाठी सज्ज आहेत़ यापैकी केवळ नंदुरबार येथील कक्षातच पाच जणांना ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे़ देशाबाहेरुन येणारे बरेच जण स्वत:हून जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेत असल्याने अडचणी दूर होत आहेत़प्रशासनानेही खबरदारी म्हणून ग्रामीण भागात परतणाऱ्या भूमिपूत्रांची माहिती देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे़ तालुकास्तरावरील अधिकारी सातत्याने परदेशातून येणाऱ्यांचा आढावा घेत आहेत़