केमिकलचा टॅंकर उलटल्याने भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:23 IST2021-02-04T12:22:59+5:302021-02-04T12:23:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील तळोदा शहाराबाहेरील बायपासलगत ऍसिडने भरलेला भरधाव ट्रक पलटी झाला.या अपघातात टँकरचे ...

Fear of overturning chemical tanker | केमिकलचा टॅंकर उलटल्याने भिती

केमिकलचा टॅंकर उलटल्याने भिती

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील तळोदा शहाराबाहेरील बायपासलगत ऍसिडने भरलेला भरधाव ट्रक पलटी झाला.या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले असून ट्रक चालकाला डोक्याला मार लागला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की,गुजरात राज्यातील दहेज (जि भरुच) येथून एचसीएल ॲसीड भरून ट्रॅन्कर (क्रमांक आर जे ०९ जी सी ७९०५) हा महाराष्ट्रातील बल्लारशहा (जि.चंद्रपूर) येथे जात होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील वळण रस्तावरुन पुढे जात असताना समोर अचानक जीप आली. जीपला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात टॅंकर    चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅन्कर रस्तालगतच्या खड्यात उलटले. त्यामुळे पेट घेतला.
     या अपघात टॅंकरचालक  सूरज बैरागी (३५) रा. उज्जैन  याला डोक्याला मार लागला. स्थानिकांनी त्याला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला डोक्याला मार लागला आहे. टँकरचा मोठे नुकसान आले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. ॲसीड गळतीने परिसरात तीव्र दुर्गंध पसरत होता.   
   केमिकलचा  टँकर उलटल्याची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी स्वतः भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. टँकरमधील केमिकल ज्वलनशील नसल्याची त्यांनी खात्री करून घेतली.तहसीलदार गिरीश वखारे यांनी देखिल तलाठी बी डी चाटे यांना घटनास्थळी पोहचुण परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले.
         दरम्यान हे अपघात स्थळ नागरी वसाहती जवळ असल्याने नागरी वस्तीत केमिकलची दुर्गंधी अनुभवास येत होती. केमिकलचे टँकर नागरी वसाहती जवळ उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. मात्र प्रशासनाने वेळीच घटनास्थळी धाव घेत त्याबाबत शहानिशा केली.

Web Title: Fear of overturning chemical tanker