धनूरच्या शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू ?

By Admin | Updated: April 28, 2017 12:59 IST2017-04-28T12:59:52+5:302017-04-28T12:59:52+5:30

धनूर येथील शेतकरी अशोक पितांबर पाटील (54) यांचे बुधवारी सकाळी उष्माघाताने निधन झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला.

Farmer of Dhanur: Death of overeating? | धनूरच्या शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू ?

धनूरच्या शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू ?

 कापडणे, जि.धुळे - तालुक्यातील धनूर येथील शेतकरी अशोक पितांबर पाटील (54) यांचे बुधवारी सकाळी उष्माघाताने निधन झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी  केला. परंतु या वृत्ताला वैद्यकीय सूत्रांचा दुजोरा मिळालेला नाही. 

धनूर येथील शेतकरी अशोक पाटील यांना मंगळवारी सायंकाळपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांना उलटय़ा व चक्कर येत होते. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परंतु त्याना जास्त त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना बुधवारी सकाळी    उपचारार्थ धुळे येथील दवाखान्यात आणत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात प}ी, आई, दोन मुले, सुना, दोन मुली व तीन भाऊ असा परिवार आहे. 

Web Title: Farmer of Dhanur: Death of overeating?