महामार्गावरील खोदकाम वाहनधारकांसाठी जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:50 PM2020-06-05T12:50:02+5:302020-06-05T12:50:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाच्या विस्तारीकरण कामाला ब्रेक लागला असून लहान शहादे गावातील एक ...

Excavation on the highway is fatal for motorists | महामार्गावरील खोदकाम वाहनधारकांसाठी जीवघेणे

महामार्गावरील खोदकाम वाहनधारकांसाठी जीवघेणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाच्या विस्तारीकरण कामाला ब्रेक लागला असून लहान शहादे गावातील एक किलोमीटरचा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे़ महामार्गावर खोदलेल्या मोरीत पाणी साचून असल्याने अपघातांची भिती असून हे पाणी गावात शिरेल अशी चिंता ग्रामस्थांना आहे़
जिल्ह्यातून जाणाऱ्या विसरवाडी ते सेंधवा आणि शेवाळी ते नेत्रंग या दोन महामार्गांच्या विस्तारीकरणाला मंजूरी मिळाली आहे़ यापैकी विसरवाडी ते सेंधवा या मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे़ परंतू नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान कोळदे गाव आणि लहान शहादा गावातून जाणाºया रस्त्यात मात्र विघ्न आले आहे़ लहान शहादे आरोग्य केंद्र ते गावापुढे ५०० मीटरचा रस्ता पूर्णपणे खडीने भरुन ठेवण्यात आला आहे़ यातच गावाच्या मधोमध बामडोद गावाकडून येणाºया नाल्यावर नुकतेच मोरी बांधण्याचा शोध काम करणाºया ठेकेदाराला लागला होता़ यातून सहा महिन्यांपूर्वी येथे खोदकाम पूर्ण करुन ठेवण्यात आले आहे़ परंतू बांधकाम मात्र रखडले आहे़ खोदकामामुळे वाहतूक ठप्प होवू नये यासाठी नजीकच वळणरस्ता काढला आहे़ परंतू हा वळणरस्ता आणि हे खोदकाम आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जिवघेणे ठरत आहे़ बुधवारी दिवसभर आणि गुरुवारी पहाटे कोसळलेल्या पावसानंतर खडी व मातीच्या या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु आहे़ खोदकामामुळे नाल्याचे वहन बंद झाल्याने पावसाळ्यात हे पाणी गावात शिरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़ याबाबत तक्रार नेमकी करावी कोणाकडे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून एमएसआरडीसी हा विभाग नेमका असतो तरी कुठे असा, प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत़ यातून जिल्हा प्रशासनानेच यावर कारवाई करण्याची मागणी आहे़

एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलेपमेंट कार्पोरेशन अंतर्गत या महामार्गाचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे़ यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे़ परंतू संबधित ठेकेदार आणि एमएसआरडीचे अधिकारीच भेटत नसल्याचे लहान शहादे व कोळदे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे़ काही दिवसांपूर्वी सुरु असलेले काम आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे़ याठिकाणी असलेले साहित्यही ठेकेदाराने उचलून नेल्याची माहिती आहे़

Web Title: Excavation on the highway is fatal for motorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.