घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या होमवर्कची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:56 IST2020-04-05T12:56:14+5:302020-04-05T12:56:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्या असल्याने विद्यार्थी घरीच अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास ...

Examining student homework from house to house | घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या होमवर्कची तपासणी

घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या होमवर्कची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्या असल्याने विद्यार्थी घरीच अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा सुरू आहे, त्यांनी होमवर्क केला का नाही याची तपासणी घरोघरी जाऊन करण्याचा अभिनव उपक्रम तालुक्यातील मंदाणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षिका करीत असून त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
तालुक्यातील मंदाणे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोनच्या मुख्याध्यापिका प्रितम नाईक व सहशिक्षिका श्रद्धा पवार यांनी कोरोना विषाणूचे संकट उद्भवल्यानंतर शासनाच्या आदेशानंतर सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी घरीच राहून अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सर्व शाळांना सुटी आहे. अशा परिस्थितीत शाळेला सुटी लागण्यापूर्वी या दोन्ही शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना घरीच राहून होमवर्क करायला सांगितले होते. विद्यार्थ्यांनी हा होमवर्क केला किंवा नाही याची तपासणी करण्यासह दररोज या दोन्ही शिक्षिका गावातील विविध भागात जाऊन विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचा होमवर्क तपासात आहे. एवढेच नव्हे तर कोरोना विषाणूचे संकट किती भयावह आहे, अशा परिस्थितीत आपण योग्य काळजी घेतली नाही तर काय होऊ शकते, शासनाने याचा प्रादुर्भाव थांबावा यासाठी लॉकडाऊन केले आहे म्हणजे नेमके काय, या कालावधीत प्रत्येक नागरिकाने काय करावे, या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी सेनीटायझर कसे वापरावे, सेनीटायझेशन म्हणजे काय अशा विविध विषयांवर जनजागृती करीत आहेत. या शिक्षिकांनी चालविलेल्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Web Title: Examining student homework from house to house