अखेर ग्रामस्थांनीच सुरू केले रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:58 AM2020-05-25T11:58:18+5:302020-05-25T11:58:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ दऱ्या खोºयाच्या भागातील खाईच्या मुख्य रस्त्यापासून ते ओहवा ...

Eventually the villagers started the road work | अखेर ग्रामस्थांनीच सुरू केले रस्त्याचे काम

अखेर ग्रामस्थांनीच सुरू केले रस्त्याचे काम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ दऱ्या खोºयाच्या भागातील खाईच्या मुख्य रस्त्यापासून ते ओहवा गोरजाबारीपाडा, अंधारबारीपाडा या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करूनही रस्ता तयार करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी स्व:खर्चातून कच्चा रस्ता तयार केला आहे.
या वेळी गोरजाबारीपाडा, अंदराईपाडा, पाटीलपाडा, जांगठापाडा, डिझेलपाडा, पाडवीपाडा येथील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बनविण्यासाठी लागणारे लोखड, विटा, पाणी, सिमेंट व इतर साहीत्य रस्त्याअभावी डोक्यावर न्यावे लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करीत जेसीबी व श्रमदानातून खाईच्या मुख्य रस्त्यापासून ओहवा गोरजाबारीपाडा ते अंधारबारीपाडा हा चार किलोमीटर रस्ता खोदून तयार करीत आहे. जेणे करून घरापर्यंत घरकुल साहीत्य व बी-बियाण्यांसह खताची गाडी पोहचविता येईल. गेल्या वर्षीदेखील ग्रामस्थांनी रस्ता तयार केला होता. मात्र पावसाळ्यात रस्ता खराब झाल्याने पुन्हा यावर्षीदेखील ग्रामस्थांनाच रस्ता करावा लागत आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील ओहवा गोरजाबारीपाडा ते अंधारबारीपाडा येथे रस्ता नसल्याने गावकºयांना गैरसोयीचे असून, या ठिकाणी रस्ता नसल्याने खाईच्या मुख्य रस्त्यापासून ते गोरजाबारीपाडा, रस्ता नसल्याने पाडवीपाडा, जांगठापाडा, डिझेलपाडा, अंदराईपाडा या पाड्यातील नागरीकांना रस्ता नसल्याने गैरसोयीचे ठरत आहे. या पाड्यातील नागरीकांना घरे बनविण्यासाठी घरकुलसाठी लागणारे सिमेंट, रेती, लोखड, कपच्ची, पाणी नेण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना आपल्या कुटुंबियांसोबत डोक्यावर व गाढवावर साहित्य न्यावे लागत असते. परंतु ते त्रासदायक असल्याने संबंधित विभागाला रस्त्या तयार करण्यासाठी पत्रव्यवहार करूनदेखील दुर्लक्ष करीत असल्याने गावकºयांनी पावसाळा जवळ आल्याने स्वत: पैसे गोळा करून श्रमदानाने मातीचा रस्ता तयार केला आहे. जेणेकरून घरकुल लाभार्थ्यांचे साहित्य पाणी व बी-बियाण्यांसह खतांची गाडी घरापर्यंत नेता येईल.
खाईच्या मुख्य रस्त्यापासून ते गोरजाबारीपाडा हा चार किलोमीटर पर्यंतचा रस्ता डांबरी करण करण्याची मागणी गोरजाबारीपाडाचे सुभाष बाज्या पाडवी, धोना रामा वसावे, गोन्या ओजमा तडवी, जोमा वेलजी वसावे, अमरसिग लालजी वसावे, रत्या रडव्या वसावे, बिरमा बोत्या वसावे, राजा कागड्या पाडवी, नीलेश कागड्या पाडवी, माकत्या सात्या पाडवी, कुवरसिंग पाड्या वसावे, रतीलाल काला पाडवी, रत्या रोडवा वसावे, लालजी जेरमा वसावे, जोमा विरजी वसावे, सागल्या बोट्या वसावे, हाद्या रोडवा वसावे आदींनी केली आहे.

गोरजाबारीपाडा येथे रस्ता नसल्याने या पाड्यातील नागरिकांना डोक्यावर साहीत्य न्यावे लागत होते. त्यामुळे गावकºयांनी वर्गणी गोळा करीत जेसीबी व श्रमदानाने जेमतेम रस्ता तयार केला. जेणेकरून घरकुल लाभार्थ्यांना साहीत्य डोक्यावर नेण्याऐवजी गाडीने घरापर्यंत नेता येईल. तरी संबंधित विभागाने खाईच्या मुख्य रस्त्यापासून ते गोरजाबारीपाडा या चार किलोमीटर दरम्यान मातीच्या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरणचा रस्ता तयार करून गैरसोय दूर करावी. -सुभाष बाज्या पाडवी, ग्रामस्थ, गोरजाबारीपाडा

Web Title: Eventually the villagers started the road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.