जिल्हा युवा महोत्सवात यंदाही अपेक्षा भंग तीन कला प्रकारात आले फक्त पाच संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:24 IST2019-12-25T12:24:29+5:302019-12-25T12:24:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात २३ पैकी तीनच कला प्रकारात ...

Even in the district youth festival, only five teams came in three art forms, breaking expectations | जिल्हा युवा महोत्सवात यंदाही अपेक्षा भंग तीन कला प्रकारात आले फक्त पाच संघ

जिल्हा युवा महोत्सवात यंदाही अपेक्षा भंग तीन कला प्रकारात आले फक्त पाच संघ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात २३ पैकी तीनच कला प्रकारात स्पर्धकांनी हजेरी लावल्याने क्रीडा विभागाचा उदासिन कारभार समोर आला आहे़ शहरातील हिग़ो़श्रॉफ हायस्कूलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली़
क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या या महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेत २, एकांकिका स्पर्धेत १ तर वक्तृत्व स्पर्धेत दोन स्पर्धकांनी सहभाग नोंदवला़ १५ ते २९ वयोगटातील या स्पर्धकांनी महोत्सवात कला सादर केली़ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गेल्या १० वर्षांपासून होत असलेल्या या स्पर्धेची नंदुरबार जिल्ह्यात स्थिती अत्यंत दयनीय आहे़ नावाला होणाऱ्या या महोत्सवासाठी विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे वेळावेळी समोर आले आहे़ गेल्या वर्षी स्पर्धकांअभावी महोत्सव दोनवेळा पुढे ढकलण्याची वेळ क्रीडा अधिकाऱ्यांवर आली होती़ हाच प्रकार यंदाही होण्याची शक्यता होती़ परंतू उपस्थित असलेल्या स्पर्धकांना सोबत घेत घाईने स्पर्धा उरकण्याचा प्रकार विभागाने केल्याने उपस्थित परीक्षकांनीही नाराजी व्यक्त केली़ कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी न केल्याने जिल्ह्यातील बºयाच शाळा महाविद्यालयात महोत्सवाबाबत माहितीच मिळालेली नाही़ विशेष म्हणजे महोत्सव झाल्याचा खर्च शासनाकडून वसुल होत आहे़
महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले़ प्रसंगी हास्य कलावंत विजय पवार, नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर, युवराज पाटील, फकीरा माळी, विकी परदेशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले़ महोत्सवात श्रॉफ हायस्कूल, शासकीय निवासी शाळा, जिजामाता महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवला़ सूत्रसंचालन हरीश चौधरी यांनी तर आभार जगदीश चौधरी यांनी मानले़ यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले़

Web Title: Even in the district youth festival, only five teams came in three art forms, breaking expectations