शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजूर प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोजगारनिमित्त परजिल्ह्यात जाणा:या मजुरांच्या सर्वागिण सुरक्षेसाठी शासनस्तरावर नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगारनिमित्त परजिल्ह्यात जाणा:या मजुरांच्या सर्वागिण सुरक्षेसाठी शासनस्तरावर नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु नोंदणीच होत नसल्याने त्यांचे जीवन असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. तर काबाडकष्ट करीत संबंधित कामे मार्गी लावत असले तरी हे काम बेदखल ठरत आहे. नंदुरबार हा मागास व आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी स्थलांतरीतांचा जिल्हा अशी दुसरी ओळखही या जिल्ह्याला जोडली जाते. अपेक्षित रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातून सर्वाधिक मजूर  शेजारील राज्ये व परजिल्ह्यात स्थलांतर करीत आहे. बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने खरीप हंगामातील शेतीची कामे तातडीने आटोपली, साखर कारखान्यांचा गळीत हंगामही सुरू झाल्याने स्थलांतराचे वारे वाहू लागले आहे. स्थलांतर करणा:यांमध्ये धडगाव, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातील सर्वाधिक मजूर असल्याचे म्हटले जाते. त्या पाठोपाठ शहादा व तळोदा तालुक्यातूनही मजुरांचे स्थलांतर होत आहे. स्थलांतरामुळे रोगराई, जंगली श्वापदांपासून मजुरांच्या जीवाला धोका, आर्थिक अडचणी यासह अन्य समस्या निर्माण होतात. या समस्यांमधून मजुरांच्या सुटकेसाठी ग्रामपंचायतीसह शासन स्तरावर त्यांची संपूर्ण नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटना काही आदिवासी संघटनांमार्फत करण्यात आली होती. परंतु त्यासाठी कुठलीच कार्यवाही झाली नाही, त्यामुळे मजूरांच्या जीवाला धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.ऊसतोड कामगारांची समस्या अधिक गंभीर होत असल्यामुळे मागील वर्षी ऊसतोड कामगार संघटनेतर्फे नोंदणीसह कामगार सुरक्षा योजना सुरू करावी, माथाडी कामगारांच्या धर्तीवर योजना लागू कराव्या यासह विविध मागण्या करण्यात आल्या. त्यापैकी काही योजना आखल्याही गेल्या, परंतु  त्याची नेमकी अंमलबजावणीच झाली नाही.यंदा धडगाव व मोलगी परिसरातील मजूर गुजरातमधील कुकरमुंडा, मटावली, दसवड तर मध्यप्रदेशातील ठिकरी व दुर्गा येथील साखर कारखान्यांमध्ये रोजगारासाठी जाऊ लागले आहेत. तर मागील वर्षाप्रमाणे पंढरपूर, सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्यातील कारखान्यांसह त्यांच्या क्षेत्रांतर्गत ऊसतोडणीसाठी दोन महिन्यांपूर्वीच आगाऊ मजूरी घेतली आहे. त्यामुळे संबंधित कामाच्या ¨ठकाणी या मजुरांना जावेच  लागणार आहे. न गेल्यास घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम संबंधितांना द्यावी लागणार असल्याने जाऊ लागले आहेत. 

मागील वर्षी धडगाव तालुक्यातील एक जोडपं त्यांच्या 10 ते 12 वर्षाच्या मुलासह तोरखेडा ता.शहादा येथे ऊसतोड कामासाठी आले होते. तेथे त्या मुलावर बिबटय़ाने हल्ला केला, त्यात मुलगा गंभीर जखमी झाला होता. दोन महिन्याच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला होता.तोरखेडय़ाच्या घटनेनंतर सुलतानपूर सुलतानपूर ता.शहादा येथे दुसरी घटना घडली. या घटनेत साक्री तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलाला बिबटय़ाने पळवून नेले. मजुरांसह ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्या मुलाच्या शरिराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले होते. मोख ता.धडगाव येथील अनिता वसावे ही महिला तिच्या जुळ्या नवजात बालिकांसह पंढरपूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेली होती. अनिता ही स्वयंपाक करीत असताना जुळ्यांपैकी एका बालिकेला बिबटय़ाने उचलून नेले होते. आधिच  आजाराने पीडित अनिता मनोमन खचून गेली, तिला आधार देण्यासाठी धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तथा स्थायिक झालेल्या नोकरदारांनी गोळा करीत महिलेला 25 हजाराची आर्थिक मदत दिली होती. मात्र तेथील वनविभागामार्फत महिलेला कुठलीही मदत मिळाली नाही.

नऊ वर्षापूर्वी राष्ट्रीय प्रत्येकाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी आधार सुरू करण्यात आले. त्याचा शहादा तालुक्यातील टेंबली येथे शुभारंभ करण्यात आला. तेथील नागरिक भूईमूग व भात काढण्यासाठी सौराष्ट्र (गुजरात) येथे स्थलांतरीत झाले आहे. त्यांच्यासोबत लोणखेडा, पाडळदा येथील मजूरही स्थलांतरीत झाले आहे.