ब्राह्मणपुरी येथे तरुणांचा उत्साह, ७४ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:10+5:302021-07-04T04:21:10+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिगंबर लिमजी पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, उपसरपंच माधवराव पाटील, संजय मराठे, चांदसैलीचे सरपंच संजय पाडवी यांच्या ...

Enthusiasm of youth at Brahmanpuri, 74 people donated blood | ब्राह्मणपुरी येथे तरुणांचा उत्साह, ७४ जणांनी केले रक्तदान

ब्राह्मणपुरी येथे तरुणांचा उत्साह, ७४ जणांनी केले रक्तदान

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिगंबर लिमजी पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, उपसरपंच माधवराव पाटील, संजय मराठे, चांदसैलीचे सरपंच संजय पाडवी यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात करण्यात आली.

शिबिरासाठी ब्राह्मणपुरी येथील श्री दत्त फ्रुट सप्लायर्स, क्रिष्णा फ्रुट पॅकेजिंग, अक्राणी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ब्राह्मणपुरीचे दिगंबर लिमजी पाटील, अनिल पाटील व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिरात ब्राह्मणपुरीसह सुलवाडे, चांदसैली येथील नागरिकांची उपस्थिती होती, तसेच केळी, पपईच्या व्यापाऱ्यांनीही रक्तदान केले. शिबिरप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र महाजन, बीट हवालदार धीरसिंग वळवी, भरत उगले, जि.प. शाळेचे शिक्षक आजीनाथ घुले, मनोहर पाटील, प्रसाद कासार, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी गोपाळ पाटील, ग्रामसेवक भटू न्हाळायदे, रवींद्र पाटील, अंबालाल पाटील, नीलेश राजपूत, पोलीस पाटील रवींद्र पवार, राज मुसळदे व ग्रामस्थ उपस्थित होते. रक्त संकलनासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे डॉ.सुनील चौधरी, कैलास पाटील, पांडुरंग गवळी, उद्धव पाटील, बिपीन पाटील, पूजा सेमे आदींनी परिश्रम घेतले.

सेल्फी पॉइंट ठरला आकर्षक

रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्साह वाढवून रक्तदान मोठ्या प्रमाणावर व्हावे, यासाठी ‘लोकमत’तर्फे ‘लोकमत रक्ताचं नात, महाराष्ट्राचं रक्त महाराष्ट्रासाठी’ हा सेल्फी पॉइंट लावण्यात आला होता. या ठिकाणी रक्तदान करून तरुणांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आवरत नव्हता, म्हणून सेल्फी पॉइंट आकर्षित ठरला होता.

महिलांचा सहभाग

रक्तदानाचे महत्त्व हळूहळू का होईना, महिलांमध्येही जनजागृती होत असताना दिसून येत असून, महिला वर्गाने प्रतिसाद दाखवत, या ठिकाणी रक्तदान केले.

Web Title: Enthusiasm of youth at Brahmanpuri, 74 people donated blood