आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर द्या-डॉ.राजेंद्र भारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:43+5:302021-02-13T04:30:43+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, रुग्ण कल्याण समिती आणि पीसीपीएनडीटी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य ...

Emphasize on strengthening health facilities - Dr. Rajendra Bharud | आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर द्या-डॉ.राजेंद्र भारुड

आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर द्या-डॉ.राजेंद्र भारुड

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, रुग्ण कल्याण समिती आणि पीसीपीएनडीटी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.के.डी.सातपुते, अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, आरोग्य केंद्रातील औषधे व इतर सुविधांबाबत नियमित आढावा घेऊन रुग्णांना चांगली सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावे. मानव विकास मिशनचा निधी लाभार्थी मातांच्या बँक खात्यावर वेळेवर जाईल याची दक्षता घ्यावी. कोविड उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावे. ग्रामीण भागात कोविड बाधित आढळल्यास त्या गावातील अधिकाधिक स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात यावेत. त्यासाठी फिरत्या पथकांची संख्या

आवश्यकतेनुसार वाढवावी. अक्कलकुवा, धडगाव आणि तळोदा येथील कोरोना बाधितांवर तळोदा येथे उपचार

करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. बैठकीस तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Emphasize on strengthening health facilities - Dr. Rajendra Bharud