शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: निवडणूक प्रचाराचा उडाला धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क   नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी 19 रोजी सायंकाळी थांबणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास ...

लोकमत न्यूज नेटवर्क  नंदुरबार : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी 19 रोजी सायंकाळी थांबणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने  शुक्रवारी प्रचार रॅलींचा धुमधडाका झाला. ऑक्टोबर हीट प्रमाणेच प्रचारतोफांच्या धडधडाटामुळे वातावरणही चांगलेच तापले. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. परंतु उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचार रॅली आणि मतदारांच्या संपर्कावर भर दिला. रात्री नंदुरबारात भाजप उमेदवाराची जाहीर सभा झाली.

अक्कलकुवा मतदारसंघात केवळ शिवसेनेतर्फे जाहीर सभा घेण्यात आली. या ठिकाणी काँग्रेसतर्फे जाहीर सभा झाली नाही. मतदारांच्या संपर्कावर भर देण्यात आला.  शहादा मतदारसंघात दोन मोठय़ा नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि जे.पी.नड्डा यांचा समावेश होता. याशिवा धावपटू देखील प्रचारात उतरला.नंदुरबार मतदारसंघात मात्र एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला होता.नवापूर मतदारसंघात शनिवारी होणारी अतित शहा यांची सभा वगळता येथे देखील भाजप, काँग्रेसने मोठय़ा सभा घेतल्या नाहीत. 

मोठय़ा नेत्यांच्या झाल्या चार सभा

यंदाच्या विधानसभा निवडणूकांसाठी  केवळ भाजप आणि शिवसेनेच्या मोठय़ा नेत्यांच्या सभांचे आयोजन केले होते. काँग्रेसतर्फे एकाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. भाजप-सेनेच्या एकुण चार नेत्यांनी सभा घेतल्या. शिवसेनेतर्फे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. एकच उमेदवार असल्याने त्यांची केवळ धडगाव येथेच सभा झाली. 

भाजपतर्फे जिल्ह्यात एकुण तीन मोठय़ा नेत्यांच्या सभा झाल्या. त्यात शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. तळोदा येथे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सभा घेण्यात आली होती़ आता शनिवारी नवापूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा होणार असल्याने त्याकडे लक्ष लागून आह़े 

यंदा प्रचार रथ नाहीच..

यंदा लक्षवेधी प्रचार झाले नाहीत. काही ठिकाणी कला पथकांचा उपयोग करण्यात आला. परंतु प्रचा रथ किंवा सजविलेली गाडी असा प्रकार कुठल्याही उमेदवाराने केल्याचे दिसून आले नाही. 

जिल्ह्यातील उमेदवारभाजप - 3 शिवसेना - 1 राष्ट्रवादी - 0 काँग्रेस - 4    वंचित बहुजन आघाडी - 2  बहुजन समाज पार्टी - 1    मनसे - 0  अपक्ष - 9