नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी आठ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:11 IST2020-05-21T18:11:24+5:302020-05-21T18:11:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी आठ जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ यात रजाळे येथील पाच, ...

Eight corona positive on the same day in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी आठ कोरोना पॉझिटिव्ह

नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी आठ कोरोना पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात एकाच दिवशी आठ जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत़ यात रजाळे येथील पाच, जिल्हा रुग्णालयातील २ तर धुळे येथून आलेल्या एकाचा समावेश आहे़
मंगळवारी रात्री नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील एकास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती़ त्याच्या कुटूंबातील ९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ त्यांचे स्वॅब रिपोर्ट गुरुवारी दुपारी प्राप्त झाले होते़ यातील पाच जण कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे़ यात दोन पुरुष आणि दोन महिलांसह एक सहा वर्षीय बालिका आहे़ दरम्यान जिल्हा रुग्णालयातील दोन पुरुष कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आहे़ शिंदखेडा तालुक्यातील एकास येथे क्वारंटाईन करण्यात आले होते़ त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ रजाळे येथील पाच बाधितांना तातडीने जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात हलवण्यात आले आहे़ तर रुग्णालयातील दोघे पुरुष व शिंदखेडा येथील १ असे तिघेही आयसोलेशन वॉर्डात दाखल झाले आहेत़

Web Title: Eight corona positive on the same day in Nandurbar district