शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला रेमडिसीवीरचा साठा मिळण्यासाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपचारासाठी डॉक्टर्स आणि रुग्णांकडून रेमडिसीवीरची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या औषधाचा शासकीय व ...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपचारासाठी डॉक्टर्स आणि रुग्णांकडून रेमडिसीवीरची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या औषधाचा शासकीय व खासगी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्याला १० हजार रेमडिसीवीर इंजेक्शन देण्यात यावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २०० बेड्स वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सहा एमडी आणि चार ॲनेस्थेशिया तज्ज्ञांची आवश्यकता आहे. मुंबई येथील तीन आणि लातूर येथील एक डॉक्टर नंदुरबार येथील स्थानिक रहिवासी असून, येथे सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता दोन महिन्यांसाठी या डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोविड केअर सेंटरसाठी पाच कोटींची मागणी

जिल्ह्यात तळोदा येथे ५०, नवापूर येथे ५०, नंदुरबार येथे १००० आणि शहादा येथे १०० ऑक्सिजन बेड्सची सुविधा असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून, आवश्यक सुविधांची निर्मिती व इतर अनुषंगिक बाबींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांनी मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही यंत्रणेला दिले होते, तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक बाबींची माहिती घेऊन आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी शासन स्तरावरून सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले होते. त्यानुसार त्यांनी त्वरित आवश्यक बाबींचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.