शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मयत विनाअनुदानित शिक्षकाच्या मुलींच्या नावे मुदतठेवी देत फेडले ऋण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 15 वर्ष विनाअनुदानित ज्ञानदान करणारे खर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथील शिक्षक जितेंद्र प्रताप पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 15 वर्ष विनाअनुदानित ज्ञानदान करणारे खर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथील शिक्षक जितेंद्र प्रताप पाटील यांचा दोन आठवडय़ापूर्वी मृत्यू झाला होता़ तुटपुंज्या मानधनावर कार्य करणा:या जितेंद्र पाटील यांच्या दोन मुलींच्या नावे शिक्षण विभाग आणि शिक्षकांच्या संघटना यांनी अडीच लाख रुपयांच्या मुदतठेवी करुन देत अनोखे ऋण फेडले आहेत़ शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ह्या मुदतठेवीच्या पावत्या त्यांच्या पत्नीच्या सुपूर्द करण्यात आल्या़ तलवाडे येथील चिराईमाता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक जितेंद्र पाटील यांचे नुकतेच निधन झाले आह़े त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, 11 महिन्याचा मुलगा, आई असा परिवार आह़े घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी त्यांच्या कुटूंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार सरलाबाई जितेंद्र पाटील यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवून 2 लाख 57 हजार मदत उभी केली गेली होती़ या मदतीचा सदुपयोग व्हावा यासाठी दोन्ही मुलींच्या नावे मुदतठेव करण्यात आली़ मुदतठेवीच्या पावत्या खर्दे खुर्द येथे जाऊन शिक्षणाधिकारी एम़व्ही़कदम, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी दिल्या़ यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, कपूरचंद मराठे, महेंद्र फटकाळ, राहुल खैरनार, गोरखनाथ बोराणे, योगेश पाटील, मनोहर साळूंखे उपस्थित होत़े