म्हसावदलाही बामखेडा पॅटर्न वापरुन बाकांवर शेण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:41 IST2020-03-26T12:41:00+5:302020-03-26T12:41:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : कोरानाबाबत दक्षता घेण्यासाठी म्हसावद येथेही बामखेडा पॅटर्न वापरून चौकांमध्ये लावलेल्या बाकांवर शेण लावण्यात आल़े़ ...

 Dung on the box using Mamsavad bamkheda pattern | म्हसावदलाही बामखेडा पॅटर्न वापरुन बाकांवर शेण

म्हसावदलाही बामखेडा पॅटर्न वापरुन बाकांवर शेण

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : कोरानाबाबत दक्षता घेण्यासाठी म्हसावद येथेही बामखेडा पॅटर्न वापरून चौकांमध्ये लावलेल्या बाकांवर शेण लावण्यात आल़े़ कोरोना बाबत दक्षता घेण्याचे वारंवार कळवूनही दुर्लक्ष होत असल्याने हा उपाय योजण्यात आला़
बामखेडा ता.शहादा येथील सरंपच प्रा.चौधरी यांनी चौकातल्या बाकांना शेण लावण्याची अभिनव कल्पना वापरली आहे़ तोच पॅटर्न वापरून म्हसावद येथील चौधरी मित्र मंडळाने बाकांना शेण लावून बैठक व्यवस्था बंद केली. म्हसावद पोलीस फौजदार देविदास सोनवणे, उपसरपंच चिंतामण लांडगे यांच्या मार्गदर्शनात म्हसावद गावातील सर्व चौका-चौकात ठेवलेल्या बाकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शेण लावले आहे़ याबाबत म्हसावद येथील ग्रामस्थांनी चांगल्या प्रतिक्रिया देत करण्यात आलेली ही कृती योग्य असल्याचे सांगून त्यास समर्थनही दिले आहे़ यामुळे गावातील गर्दी काहीअंशी कमी झाली आहे़
दरम्यान म्हसावद गावात औषधी धुरळणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title:  Dung on the box using Mamsavad bamkheda pattern