शासनाचा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने शेतक:यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:42 IST2020-04-12T12:42:10+5:302020-04-12T12:42:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीमाल विक्रीसाठी शासनाने बाजार समित्या सुरू करण्याचा अध्यादेश काढला असला तरी हा अध्यादेश कृषी ...

Due to non-understanding of the government's ordinance, the farmers of the state | शासनाचा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने शेतक:यांची दैना

शासनाचा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने शेतक:यांची दैना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतीमाल विक्रीसाठी शासनाने बाजार समित्या सुरू करण्याचा अध्यादेश काढला असला तरी हा अध्यादेश कृषी विभागाने समजून न घेतल्याने जिल्ह्यातील शेतक:यांचे माल विक्रीसाठी संभ्रम निर्माण झाला आहे. 
सध्या शेतक:यांच्या घरात धान्य पडून आहे. लॉकडाऊन मुळे बंधने आल्यामुळे त्यातून मार्ग काढत शासनाने बाजार समित्यांना धान्य खरेदी संदर्भात अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार शेतक:यांनी ज्यांना धान्य विक्री करायची असेल त्यांनी तालुका कृषी अधिका:याकडे नोंद करावी व कृषी अधिकारी बाजार समितीतील गर्दी नियंत्रणात       राहावी यासाठी टोकण देतील अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शेतकरी तालुका कृषी अधिका:यांकडे माल विक्रीसाठी नोंद करीत असले तरी कृषी विभागाकडून मात्र शेतक:यांना बाजार समितीच्या निवडीबाबत बंधने आणली   जाताहेत. 
शेतक:यांची नोंदणी करतांना कृषी अधिकारी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणच्याच बाजार समितींना माल विक्रीची सक्ती करीत आहेत. वास्तविक नंदुरबार बाजार समिती ही राज्यात सर्वदूर प्रसिद्ध  आहे. 
जिल्ह्यातील शेतकरी तेथे दरवर्षी धान्य विक्री करीत आहेत. तर शहादा बाजार समिती देखील हरभरा खरेदीसाठी सर्वदूर परिचित आहे. त्यामुळे शेतक:यांना हरभरा विक्री करायची असेल तर ते शहादा बाजार समितीत विक्री करतात. तर गहू विक्री करायची असेल तर नंदुरबार बाजार समितीत आणतात. परंतु तालुका  कृषी अधिकारी बाहेरील  तालुक्यातील शेतक:यांना तशी परवाणगी देत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले असून जिल्हाधिका:यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. 
वास्तविक शासनाचा अध्यादेशात असे कुठेही नमुद केलेले नाही. जिल्हा उपनिबंधकांशी आपण संपर्क साधला असता त्यांनी देखील कुठल्याही तालुक्याचा शेतकरी कुठल्याही बाजार समितीत धान्य विकू शकतो असे सांगितले आहे. त्यामुळे कृषी विभागाने नोंद करून त्या त्या बाजार समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. परंतु त्यांनी अध्यादेश समजून न घेतल्याने गोंधळ होत आहे. 
-हरि दत्तू पाटील, शेतकरी, प्रकाशा.

Web Title: Due to non-understanding of the government's ordinance, the farmers of the state