गळतीमुळे सुसरी धरणाने तळ गाठला

By Admin | Updated: May 24, 2017 00:27 IST2017-05-24T00:27:11+5:302017-05-24T00:27:11+5:30

शेतकºयांमध्ये चिंता : पिके वाचविण्यासाठी कसरत

Due to the leak, the bottom of the well has reached the bottom | गळतीमुळे सुसरी धरणाने तळ गाठला

गळतीमुळे सुसरी धरणाने तळ गाठला

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा-खेतिया मार्गावर दरा फाट्याजवळील सुसरी धरणाच्या गेटमधून होणाºया पाण्याच्या गळतीमुळे धरणाने  तळ गाठला असून उन्हाळी पिके घेणाºया शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.
सुसरी धरणातील पाण्याचा परिसरातील शेती सिंचनासाठी फायदा होतो. मात्र यंदा धरणाने तळ गाठल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडत आहे. पिकांना पाणी कमी पडल्याने उत्पन्नात घट येणार असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागणार आहे. या धरणाच्या गेटमधून पाण्याची गळती लागल्याने पाणीसाठा कमी झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. धरणातील होणारी पाणी गळती रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेने वेळीच लक्ष दिले असते तर धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत. धरणात पाणीसाठा नसल्याने परिसरातील गावांना पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.
धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे तोडणे आवश्यक आहे. झुडपांमुळे          धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत             नाही. संबंधित विभागाने या  धरणाकडे लक्ष देऊन पाण्याची होणारी गळती थांबवावी व भिंतीवर असलेली झुडपे काढण्याची मागणी होत आहे.

Web Title: Due to the leak, the bottom of the well has reached the bottom