कोरोनामुळे जिल्हा परिषद सिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:25 IST2020-03-21T11:25:35+5:302020-03-21T11:25:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या धास्तीने दक्षता म्हणून सर्वच शासकीय कार्यालयात गर्दी कमी करण्याचे आदेश आहेत़ यात जिल्ह्याचे ...

Due to Corona, District Council Sill | कोरोनामुळे जिल्हा परिषद सिल

कोरोनामुळे जिल्हा परिषद सिल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या धास्तीने दक्षता म्हणून सर्वच शासकीय कार्यालयात गर्दी कमी करण्याचे आदेश आहेत़ यात जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेले जिल्हा परिषद भवन आघाडीवर असून ही इमारत पूर्णपणे सील करुन मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जात आहे़
कायम गजबजलेल्या जिल्हा परिषद इमारतीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ नागरिकांनी तक्रारी घरुन पाठवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते़ परंतू आता थेट मुख्य प्रवेशद्वार बंद करुन त्याठिकाणी नोंदणी कक्ष निर्माण केले गेले आहे़ याठिकाणी संपूर्ण ओळख दिल्यानंतर कामाचे स्वरुप दिल्यानंतर गरजेचे असेल तरच आत प्रवेश दिला जात आहे़ येथून आतील भागात गेल्यास मुख्य दरवाजाबाहेर एक कर्मचारी नियुक्त असून चौकशीनंतर कर्मचारी आत सोडत आहे़ या नियोजनबद्धतेमुळे गेल्या २० वर्षात प्रथमच जिल्हा परिषदेच्या इमारतीत शासकीय कामकाजाच्या दिवशी ‘पीन ड्रॉप’ सायलन्स अनुभवण्यास मिळत आहे़ दरम्यान आत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हँड वॉश व सॅनेटायझर यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पुढील आदेशमिळेपर्यंत याचप्रमाणे कामकाज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Due to Corona, District Council Sill