शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात उमटू लागला ढोल व होळी गीतांचा सुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवघ्या भारतात फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होत असली तरी सातपुड्यातील आदिवासींमध्ये माघ अमावास्येपासूनच होळीपर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवघ्या भारतात फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होत असली तरी सातपुड्यातील आदिवासींमध्ये माघ अमावास्येपासूनच होळीपर्व सुरू झाले. परंपरेनुसार यंदाच्या अमावास्येला सातपुड्यातील प्रत्येक गावपंचायतीने नियोजित पुजाऱ्यांमार्फत होळीसाठी गोवºयासह सागाचा दांडा रोवला. अमावास्येपासून महिला-मुलींमध्ये होळीगीत व लोलगीतांचा सुर उमटू लागला.अमावास्येला दिसलेल्या नव्या चंद्रदेवतेचे दर्शन घेऊन होळीदेवतेची पथ्ये पाळणाºया (होळीनृत्य पथकातील कलाकार) मोरखी, बावा, ढाणका डोकोअं, तीर-कामठाधारी मोरावाला यांनी व्रत (पालनी) सुरू केले. या कालावधीत त्यांना मासांहार वर्ज्य असते. महिला व महिलांच्या कुठल्याही कपड्यांना स्पर्श न करणे शिवाय खाट-खुर्ची, चप्पलांचा त्यागही करावा लागतो. आवश्यकतेपेक्षा अधिक वेळ कपडे परिधान करणे, दगड फेकुन मारणे, अपशब्द उच्चारणे अशा बाबी देखील टाळत आहे. आदिवासींचा होळी हा एकमेव सण असून तो केवळ एका दिवसात साजरा होत नाही, एक-एक करीत महिनाभर साजरा होणारा हा उत्सव आहे.सातपुड्यातील आदिवासींच्या ताब्यात केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेतीच असल्याने रोजगाराचा नेहमीच वानवा असते. पावसाळा संपल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्यात बहुसंख्य आदिवासी रोजगारानिमित्त परप्रांतात स्थलांतर झाले, घर व गाई-गुरांच्या देखभालीसाठी कुटुंबातील लहान मुलं-बाळंच मूळगावी राहिले होते. होळीनिमित्त तब्बल सहा महिन्यांनी गावी परतले असून ओस पडलेली सातपुड्यातील गावे माघ महिन्यातच गजबजली आहे. हे सर्व बांधव सामुहिकपणे होलीकोत्सवाची तयारी करीत आहे.आदिवासी संस्कृतीचे प्रतिक ठरणारे ढोल एकाच गावातील होळीत तब्बल १०० पेक्षा अधिक दाखल होत असून चांगला, सुरेल, मधूर पण सर्वोच्च आवाज असणाºया ढोल मालकाला सर्वोच्च मान दिला जातो. शिवाय निवडक ढोल मालकांना क्रमानुसार बक्षिसेही दिली जातात. त्यामुळे ढोल नव्याने तयार झाले आहे. तर सर्व जुन्या ढोलची पुनर्बांधणी झाली आहे. ढोल वादक देखील अनेक दिवसापासून सराव करीत आहे. ही गीते सातपुड्यातील आदिवासींना सुखसमृद्धीचा संदेश देत आहे. व्रत पाळणाºया कलाकारांनी देखील त्यांना लागणाºया साहित्यांची जुडवा-जुडव करीत सहभाग नोंदवित आहे.