शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकांना कोरोना काळातील प्राेत्साहन भत्त्याची अद्यापही प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

नंदुरबार : गुजरात राज्यातून आपल्या राज्यांकडे पायी निघालेल्या मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने एस. टी.च्या विशेष बस सोडल्या होत्या. ...

नंदुरबार : गुजरात राज्यातून आपल्या राज्यांकडे पायी निघालेल्या मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने एस. टी.च्या विशेष बस सोडल्या होत्या. या बसवरील चालक व त्यांना मदत करणारे वाहक यांना प्रत्येकी ३०० रूपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, अद्यापही चालक-वाहकांना हा भत्ता मिळाला नसल्याची माहिती आहे.

नवापूर येथील सीमा तपासणी नाका व अक्कलकुवा येथून विशेष बस थेट छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत चालविण्यात आल्या होत्या. यातून पायी जाणाऱ्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला होता. परराज्याच्या सीमेपर्यंत धावणाऱ्या या बसेसच्या चालक व वाहकांना प्रत्येक फेरीनिहाय ३०० रूपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा किंवा नवापूर आगारातील एकाही चालक किंवा वाहकाला हा भत्ता मिळालेला नसल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठांकडे संबंधित चालक व वाहकांच्या नावांच्या याद्या गेल्या आहेत.

नवापूर येथील सीमा तपासणी नाका तसेच अक्कलकुवा तालुका मार्गाने नंदुरबार जिल्ह्यातून आपल्या राज्याकडे जाणाऱ्या साधारण १८ हजार प्रवाशांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांतून बसेस सोडण्यात आल्या होत्या. गुजरात राज्यात अडकलेल्या चार हजार प्रवाशांनाही परत आणण्यात आले होते. यासाठी एकूण ६४१ बसफेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती आहे. नंदुरबार आगारातील ३५०, नवापूर आगारातील २४०, शहादा ३०० तर अक्कलकुवा आगारातील सुमारे १५० चालक-वाहक या उपक्रमात सहभागी होते. त्यांच्याकडून पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगढ व मध्यप्रदेश राज्यातील मजुरांना घराकडे पोहोचते करण्यात आले होते. या दरम्यान एकाही चालक किंवा वाहकाला कोरोनाची लागण झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

चारही आगारांतील संघटनांकडून प्रयत्न

नंदुरबारसह शहादा, नवापूर व अक्कलकुवा आगारांतून या बसेस चालविण्यात आल्या होत्या. चालक व वाहक जोखीम पत्करत मजुरांना घेत मार्गक्रमण करत होते. यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका होता. यातून त्यांना जाहीर झालेला ३०० रूपये प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला नाही. आगाराच्या स्तरावर चालक व वाहकांच्या याद्या विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. या याद्यांवर काम व्हावे, यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी पाठपुरावा करत असल्याची माहिती देण्यात आली. या याद्यांनुसार भत्ता देण्याची मागणी होत आहे.

नंदुरबार आगारातून कोरोना काळात परराज्यात जाणाऱ्या मजुरांसाठी सेवा देणाऱ्या चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता येत्या काही दिवसात मिळणार आहे. विभागीय कार्यालयाकडे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकही कर्मचारी या भत्त्यापासून वंचित राहणार नाही.

- मनोज पवार,

आगारप्रमुख, नंदुरबार.