शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग १५ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा दुप्पटीचा वेग १२ दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. सद्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा दुप्पटीचा वेग १२ दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. सद्य स्थितीत ७८ बाधीत असून त्यातील ३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वयोगट देखील सर्वच गटातील असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभुमीवर गेल्या चार दिवसांपासून नंदुरबारात लॉकडाऊन करण्यात आले. त्याला जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी मदत होणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर १८ एप्रिलपासून सुरू आहे. सुरुवातीला कोरोना रुग्णाचा वाढीचा दर हा स्थिर होता. किमान ८ ते जास्तीत जास्त १५ दिवसात रुग्ण आढळत होते. परंतु लॉकडाऊनमध्ये जशी शिथीलता मिळत गेली तसे रुग्ण वाढीचा वेग देखील वाढत गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सद्य स्थितीत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा शतकाकडे वाटचाल करू लागला आहे.लॉकडाऊन शिथिलता मुळावरजिल्ह्यात एक ते तीन लॉकडाऊनच्या दरम्यान रुग्ण वाढीचा वेग अतीशय कमी होता. तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत संख्या २४ पर्यंत मर्यादीत होती. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा आॅरेेंजझोन मध्ये आल्यानंतर विविध बाबींमध्ये शिथीलता दिली गेली. त्यामुळे व्यवहार सर्वसामान्य झाल्यानंतर हळूहळू रुग्ण संख्या वाढत गेली. ती जिल्हावासीयांच्या मुळावर उठली आहे. त्यामुळे काही निर्बंधांची कडक अमंलबजावणी होणे आता अपेक्षीत झाले आहे.संपर्क साखळी वाढलीजिल्ह्यात गेल्या २ आठवड्यापूर्वी दिवसभर बाजार सुरू ठेवणे, एस.टी.बस वाहतूक सुरू करणे, प्रवासी वाहनांना परवाणगी देणे यासह अनेकांनी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्याने संपर्क साखळी वाढण्यात मदत झाली. याशिवाय जिल्हाबाहेरून येणाऱ्यांवरही निर्बंध शिथील केल्याने त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आॅरेंज झोन जाहीर होईपर्यंत रुग्णसंख्या २४ होती. त्यानंतर गेल्या १२ दिवसापर्यंत संख्या ३४ वर येऊन पोहचली. मात्र त्यानंतर ती थेट ७८ वर आली आहे. दुप्पटीचा ेवेग हा १२ ते १६ दिवसांवर येऊन ठेपला आहे.येत्या काळात नागरिकांनी काळजी घेतली नाही, संपर्क साखळी खंडित करण्याचा प्रयत्न झाला नाही तर संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास, जिल्हाबाहेरून आलेल्यांनी आपली काळजी घेत आरोग्य यंत्रणेला माहिती देवून आरोग्य तपासणी करून घेतल्यास मोठा फरक पडणार आहे. त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे.तळोदाही प्रभावीतजिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपर्यंत तळोदा व धडगाव हे दोन तालुके कोरोनापासून दूर होते. परंतु मुंबई व इतर प्रतिबंधीत क्षेत्रातून आलेल्या नागरिकांमुळे तळोदा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भावर वाढल्याचे दिसून येत आहे. पाच दिवसात तळोद्यात थेट आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तळोदाही आता कोरोना प्रभावीत झाला आहे. दुर्गम भागातील मोलगी येथेही एक रुग्ण आढळून आला आहे. आता केवळ धडगाव तालुका कोरोनापासून मुक्त आहे. तो तालुका तसाच राहावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सुदैवाने उत्तर महाराष्टÑात नंदुरबार जिल्ह्यातच कोरोनाचा आकडा १०० च्या आत आहे.दुधाळे शिवारातील एक रुग्णदुधाळे शिवारातील कोकणीहिल भागातील गंगाईनगर येथील एक युवक नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या भागात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. सकाळी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात आली. याशिवाय दुधाळे गाव आणि शिवारातील विविध वसाहतींमधील व्यावसायिकांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. संबधित रूग्णाच्या परिवारातील सदस्यांना आरोग्य तपासणीसाठी सकाळी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते.

नंदुरबारात मंगळवारपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी शुक्रवारी मध्यरात्री संपला. त्यामुळे शनिवारपासून दिवसभर व्यवहार सुरळीत होणार आहेत. अर्थात पूर्वीप्रमाणेच सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू करण्यास परवाणगी राहणार आहे. याशिवाय शहरातील चारही भागात लावण्यात आलेले बॅरीकेट्स काढण्यात येणार असून ज्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण राहत नाही अशा ठिकाणी ते कायम ठेवण्यात येणार आहे. चार दिवसात संपर्क साखळी तोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आल्याचा प्रशासनाने दावा केला आहे. दरम्यान, रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत मनाई आदेश राहतील.