शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाची लस घेतल्यानंतर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांना दोन महिने थांबावे लागणार आहे. आयसीएमआरने यासंदर्भातील एक पत्रच जिल्ह्यातील ...

नंदुरबार : कोरोनाची लस घेतल्यानंतर स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांना दोन महिने थांबावे लागणार आहे. आयसीएमआरने यासंदर्भातील एक पत्रच जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना दिले आहे. यातून रक्तदात्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय व जनकल्याण अशा दोन रक्तपेढ्या आहेत. या ठिकाणाहून गरजवंतांना तातडीने रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. कोरोनाकाळात या ठिकाणाहून रक्तपुरवठा करण्यात अडचणी आल्याचे दिसून आले होते. सध्या सुरू असलेल्या कोरोना लसीकरण काळातही हीच स्थिती आहे. रक्त संकलन कमी झाले असल्याने चिंता वाढल्या आहेत. यातच लसीचा पहिला डोस घेतल्यावर २८ तर दुसरा डोस घेतल्यावर २८ दिवस रक्तदान करणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याने ही टंचाई वाढण्याची भीती आहे. यामुळे कोरोना लसीकरणापूर्वी अनेक जण रक्तदान करून घेण्यासाठी रक्तपेढ्या गाठत आहेत.

कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन ही लस घेतल्यानंतर संबधितांना ताप येणे किंवा इतर तत्सम लक्षणे दिसून येतात. अशा काळात रक्तदान करणे धोकादायक ठरू शकते. अशक्तपणा येण्याची दाट शक्यता असल्याने पहिल्या व दुसऱ्या डोसनंतर ठरावीक काळाने लस घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

रक्तदान करण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे सूचित करण्यात आले आहे. याबाबत विशेष अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामकाज करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अनेक जण लस घेण्याआधी संपर्क करत असल्याची माहिती आहे.

लस घेण्याआधी केले रक्तदान

कोरोना लस घेण्यापूर्वी रक्तदान केले आहे. इतरांनीही याच प्रकारे रक्तदान केल्यास रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा होणार आहे. यातून गरजूंना रक्त देण्याची वेळ आल्यास ती तातडीने पूर्ण करण्यात येईल. कोरोना लस घेणे आणि रक्तदान याबाबत सोशल मीडियात काही गैरसमज आहेत. नागरिकांनी त्याकडे लक्ष न देता, तज्ज्ञांचा सल्ला घेत लस घ्यावी, ही अपेक्षा आहे.

- मोहन सूर्यवंशी, रक्तदाता, नंदुरबार

रक्तदान करण्यासाठी नियमित येणारे रक्तदाते संपर्कात आहेत. ४५ पूर्ण केलेले अनेक जण लस घेणार आहेत. तत्पूर्वी एकदोघांनीच रक्तदान केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी योग्य पद्धतीने लस घ्यावी.

- डाॅ. के.डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

लस घेतल्यानंतरचा अशक्तपणा हा व्यक्तीच्या प्रकृतीवर परिणाम करणारा आहे. यामुळे लस घेतल्यानंतर रक्तदान कधी करावे याबाबत रुग्णांना वेळोवेळी सल्ले देत आहोत. रक्तपेढीच्या संचालकांसोबत बोलून नागरिकांना माहिती देत आहोत.

- डाॅ. राजेश वळवी,

अध्यक्ष, माडा, नंदुरबार