शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही डोस घेतल्याने डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी टाळताहेत पीपीई किटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

जिल्ह्यात एकूण सात शासकीय तर २० खासगी कोविड केअर सेंटर्स व रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या ४१० बेड्स आहेत. ...

जिल्ह्यात एकूण सात शासकीय तर २० खासगी कोविड केअर सेंटर्स व रुग्णालये आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या ४१० बेड्स आहेत. यातील १५२ सध्या रिकामे आहेत. तर ९ कोविड केअर सेंटरमध्ये ७३९ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी २१० रुग्ण उपचार घेत असून ५२९ बेड हे रिकामे आहेत. या ठिकाणी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे निश्चिंत झाले असून त्यांच्याकडून पीपीई किट टाळले जात आहे. याला प्रमुख कारण सुरू असलेला उन्हाळाही असल्याचे सांगण्यात आले आहे. बहुतांश वैद्यकीय अधिकारी रुग्ण तपासणीसाठी जाताना, तोंडावर दोन मास्क, फेसशिल्ड, हँड ग्लोव्हज यांचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. पीपीई किट हे वजनाने जड आणि रुग्णांची सेवा करण्यात अडचणीचे ठरत असल्याने आरोग्य कर्मचारी त्याचा वापर टाळत असल्याचे जिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णालयात दिसून आले.

पीपीई किट नसला तरीही याेग्य ती काळजी घेतल्यास कोरोनाची लागण होत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. केवळ आयसीयूमध्ये रुग्णसेवा करणारे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका या पीपीई किटचा सध्या वापर करत असल्याचे सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात हीच स्थिती आहे.

उकाड्यामुळे पीपीई किट हे सोयीस्कर नाही. आणि लसीचे दोन्ही डोस झाल्याने कोणतीही अडचण नाही. यामुळे पीपीई कीटचा वापर कमी झाला आहे. सर्वच डाॅक्टर्स आता अधिक सजग झाले आहेत.

-वैद्यकीय अधिकारी, सिव्हील,

आम्हा महिला डाॅक्टर्ससाठी पीपीई किट अत्यंत जीवघेणे असेच आहे. यातून काही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेल्या वर्षापासून पोटदुखीचे आजार जडले होते. म्हणून ते यंदा टाळले जातात.

-वैद्यकीय अधिकारी, सिव्हील,

कोरोना काळात सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी हे तोंडावर मास्क व हाताला ग्लोव्हज लावून तपासणी करत होते. काही मोजक्या परिचारिका रुग्णालयात पीपीई किटचा वापर करत होते. काही नातेवाईक बाहेरून आणलेले पीपीई किट घालून रुग्णांना भेटण्यासाठी येत होते. पीपीई किटपेक्षा ग्लोव्हज आणि मास्क बरे असल्याचे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका सांगत असतात.

-कोरोनामुक्त रुग्ण,

नंदुरबार,

कोविड केअर सेंटर्समध्ये सामान्य लक्षणे असलेले रुग्ण दाखल आहेत. यातून या ठिकाणी पीपीई किट वापराकडे दुर्लक्ष केले जाते. इतर सुरक्षेला महत्त्व आहे.

-आरोग्य कर्मचारी, नंदुरबार

पीपीई किट हा एक अवजड सुरक्षा उपाय आहे. जाेखमीच्या रुग्णांना तपासताना त्याचा वापर केल्यास काही हरकत नाही, पण सतत वापर अशक्य आहे.

-परिचारिका, कोविड सेंटर

कोविड वाॅर्डात दाखल होण्यापर्यंत खूप भीती होती. परंतू या भीतीतून सावरण्यास मदत झाली. या ठिकाणी पीपीई किट घातलेले कर्मचारी व अधिकारी दिसून आले नाहीत.

-कोरोनामुक्त रुग्ण, नंदुरबार