शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिवनावश्यक वस्तूंचा अतिरिक्त साठा करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश पुढील २१ दिवस अर्थात १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.गदीमुुळे करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र फिरू नये किंवा एकाच ठिकाणी गर्दी करू नये. पेट्रोल, डिझेल, किराणा सामान, दूध, अंडी, मांस, फळे, भाजीपाला, ब्रेड, मासे आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याने एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी करू नये, तसेच वस्तूंचा अतिरिक्त साठादेखील करू नये. स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी यांनी समन्वयाद्वारे दुकानांची वेळ निश्चित करून नागरिकांना त्याची माहिती द्यावी.जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना जिल्ह्यात येण्यास व बाहेर जाण्यास अनुमती देण्यात आली आहे. अशा वस्तूंच्या वाहतूकीत काही अडथळे आल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपल्या वाहनांवर ह्यअत्यावश्यक सेवाह्ण असे ठळकपणे दिसणारे स्टीकर लावावे. नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे व अनावश्यक बाहेर फिरू नये. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जागतिक आरोग्य संघटना, केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत आलेल्या सुचनांचे पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील डॉ.भारूड यांनी केले आहे.ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमकरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी फवारणी करून निर्जतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना वैयक्तिक व परिसराची स्वच्छता राखण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. काही ठिकाणी स्थानिक भाषेतून संदेश देण्यात येत आहे. घंटागाडी व रिक्शद्वारे संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहनदेखील करण्यात येत आहे.बाहेरून आलेल्या प्रवाशांचे प्रबोधनबाहेरील जिल्हा अथवा राज्यातून आलेल्या प्रवाशांचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रबोधन करण्यात येत असून त्यांना आवश्यक दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. आवश्यकता असल्यास क्वॉरंटाईन केंद्रात त्यांना ठेवण्यात येत आहे. काही व्यक्तिंना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गुजरात येथून आलेल्या मजूरांचीदेखील आमलाड येथे आरोग्य तपासणी करण्यात आली.चोख पोलीस बंदोबस्तसंचारबंदीचे पालन योग्यरितीने होण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी करून केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना सोडण्यात येत आहे.अनावश्यक बाहेर फिरणाºयांविरूद्ध कडक कारवाई करण्याबरोबर गरजू व्यक्तीस मदत करताना पोलिसातल्या माणूसकीचे दर्शनही अशावेळी घडते आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात येणाº्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलीस दलामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांना सहकायार्साठी २०० होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी होमगार्ड महासमादेशक यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. जिल्ह्यात संचारबंदीची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्यासाठी होमगार्डची सेवा उपयोगी ठरणार आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन केंद्रात बाहेरच्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या संशयित व्यक्तिंना ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत क्वॉरंटाईन व्यक्तिंचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. भविष्यात पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास व संसर्ग वाढल्यास आवश्यक तयारीचा भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षेच्या साधनांची पुरेशा प्रमाणात तातडीन व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी यंत्रणेला दिले. चेहºयाचे आच्छादन, गॉगल, मास्क आदी आवश्यक साहित्य आयसोलेशन सेंटरच्या ठिकाणी उपलब्ध असावे असे त्यांनी सांगितले.