सातपुडय़ात बंद बससेवेनेच साजरी होणार दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:12 PM2019-10-15T13:12:09+5:302019-10-15T13:12:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे दरड कोसळत रस्तेही वाहून गेले. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी भागातील परिवहन महामंडळामार्फत 20 ...

Diwali will be celebrated only by a closed bus service in Satpudya | सातपुडय़ात बंद बससेवेनेच साजरी होणार दिवाळी

सातपुडय़ात बंद बससेवेनेच साजरी होणार दिवाळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार: ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे दरड कोसळत रस्तेही वाहून गेले. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी भागातील परिवहन महामंडळामार्फत 20 बसफे:या बंद करण्यात आल्या. रस्त्याची दुरुस्ती झाली असली तरी बससेवेला अनुकुल नसल्याने बस सुरू करण्यात आली नाही. आचारसंहिता असल्यामुळे रस्त्याचे पुढील काम थांबविण्यात आले आहे. याच कालावधीतील दिवाळी सातपुडय़ात बससेवेविनाच साजरी होणार आहे.  न रहे. 
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळल्या व रस्ताही वाहून गेला. शिवाय दुर्गम भागातील काही रस्त्यांचीही दुरावस्था झाली. त्यामुळे अक्कलकुवापासून मोलगी व धडगावर्पयत दिली जाणारी बससेवा परिवहन महामंडळामार्फत बंद करण्यात आली. देवगोई घाटातील रस्त्याची काही प्रमाणात दुरुस्ती झाली असली तरी हा रस्ता मोठी वाहतुक बससेवेसाठी प्रतिकुलच ठरत आहे. रस्त्याची दुरुस्ती सुरू असतानाच आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढील कामात व्यत्यय आला असून सद्यस्थितीत हे काम बंदच आहे. त्यामुळे बससेवाही पूर्ववत करण्यात आली नाही. त्यात अक्कलकुवा आगारामार्फत 15 तर याच मार्गावरुन धडगावर्पयत जाणारी नंदुरबार आगाराची एक बस अशा 16 बसफे:या बंद आहे. त्यात अक्कलकुवा ते मोलगी, कोठली, भगदरी, धडगाव, जमानामार्गे धडगाव, डाब, जमाना, बिजरीगव्हाण व नंदुरबार ते धडगाव आदी बसेसचा समावेश आहे. या पाठोपाठ तळोदा ते चांदसैली रस्ताही ठिकठिकाणी तुटल्यामुळे या मार्गाने सुरू असलेल्या मिनी बसच्या चारही बसफे:या नंदुरबार आगारामार्फत बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीने सातपुडय़ातील नागरिकांवर पायी प्रवास लादल्याचे म्हटले जात आहे. सर्वच बसफे:या बंद केल्या असून या दोन्ही मार्गावर केवळ खाजगी प्रवासी वाहतुक करणारी वाहनेच सुरू आहे. याच वाहनातून धडगाव-मोलगी परिसरातील नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. 
आचारसंहिता कालावधीतच यंदाची दिवाळी साजरी होणार असून नोकरी तथा कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले सातपुडय़ातील आदिवासी दिवाळीसाठी गावाकडे परतु लागली आहे. परंतु बससेवा  बंद असल्याने त्यांना खाजगी  प्रवासी वाहनानेच जावे लागत आहे. दिवाळी साजरी होईर्पयत आचारसंहिता संपणार नसून रस्त्याचे कामही पूर्ण होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गम भागातील 

दिवाळीत अस्तंबा ता.धडगाव येथील अश्वस्थामा यात्रा भरविली जाते. या  यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह परराज्यातूनही भाविक येत असतात. भाविकांची संख्या लक्षात घेत अक्कलकुवा आगारामार्फत दरवर्षी वाढीव बसफे:याही सुरू करण्यात येतात. ही यात्रा दिवाळीच्या हंगामात महामंडळाला अपेक्षेनुसार उत्पन्न मिळवून देते. परंतु यंदा वाहतुकच बंद असल्यामुळे अश्वस्थामा यात्रेतून परिवहन महामंडळाला मिळणा:या नियमित  उत्पन्नासह वाढीव उत्पन्नही यंदा मिळणार नाही. 
 

Web Title: Diwali will be celebrated only by a closed bus service in Satpudya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.