शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २७ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना देण्यात येणाºया पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे़ यातून आतापर्यंत ४५ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले असून ५५ टक्के कर्जाचे वाटपही जूनमध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे़
एप्रिल महिन्यापासून जिल्हा बँकेने कर्जाचे वाटप सुरु केले आहे़ यातून आजअखेरीस २७ कोटी २९ लाख ४० हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप झाले आहे़ जिल्ह्यात बँकेकडून विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत कर्जाचे वाटप करण्यात येते़ यातून आतापर्यंत २३५ पैकी १४५ संस्थांनी त्यांच्या सभासद शेतकºयांना कर्ज पुरवठा केल्याने शेतीकामांना वेग आल्याची माहिती आहे़ दरम्यान २ हजार ८४० खातेदारांना बँकेच्या जिल्ह्यातील २९ शाखांमधून कर्ज वाटप करण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत यंदा बँकेने कर्ज वाटपाला वेग दिला असल्याने शेतकºयांना खरीप हंगामाचे नियोजन करणे सोपे झाले आहे़ यंदा बँकेने शेतकºयांची गर्दी टाळण्यासाठी रुपे कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटप केले आहे़ यातून शेतकºयांना विविध कार्यकारी संस्था आणि बँकेच्या शाखेतून मोबाईलवर मेसेज देऊन वाटप करण्यात आलेल्या कार्डच्या माध्यमातून मंजूर केलेल्या कर्जाची माहिती मिळत आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणात अडचणी येण्याची शक्यता शेतकºयांनी वर्तवली होती़ परंतू याउलट स्थिती सध्या आहे़
दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमाफी योजनेसह २०१७ नंतरच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीच्या याद्यांमध्ये नावे नसल्याने अनेक शेतकºयांना कर्ज मिळण्यास येणाºया अडचणी कायम आहेत़ मागील थकीत रक्कम जैसे थे असल्याने शेतकºयांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत़ जिल्हा बँकेत गेल्या वर्षाच्या परतावा देणारे शेतकरी आणि संस्था यांना प्रथम प्राधान्याने कर्ज दिले जात आहे़ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत कर्जमागणी करणाºया शेतकºयांना नाहकरत प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत असल्याने शासनाने कर्जमाफीच्या याद्या देऊन पीक कर्ज मिळण्याचा अडसर दूर करण्याची मागणी केली आहे़

आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात ६० संस्था व १ हजार १९७, शहादा ५९ संस्था व १ हजार २३२ शेतकरी, तळोदा १० संस्था १२८ शेतकरी, अक्कलकुवा १ संस्था १८ शेतकरी तर नवापुर तालुक्यात १५ संस्था व २६५ सभासद शेतकरी यांना कर्ज देण्यात आले आहे़ शेतकºयांना देण्यात आलेल्या या कर्जामुळे जिल्ह्यातील ४ हजार ५४६ क्षेत्र संरक्षित करण्यात आले असल्याची माहिती आहे़