२८ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 01:00 PM2020-04-08T13:00:00+5:302020-04-08T13:00:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे शाळांना सुट्या असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे नियम ...

Distribution of nutritious food to 4 thousand students | २८ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप

२८ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे शाळांना सुट्या असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत तालुक्यातील २७ हजार ९३१ विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्यात आला आहे.
तालुक्यात विविध १४ केंद्रांतर्गत एकूण २४४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये २७ हजार ९३१ विद्यार्थी शिक्षण घेत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेत कोरोना काळातील नियमांचे पालन करीत पोषण आहाराचे वाटप झाले. गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांच्यासह त्या त्या भागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे वाटप झाले. त्यात ८३८ क्विंटल तांदूळ, ९३ क्विंटल १९ किलो मसूरदाळ, ८६ क्विंटल १८ किलो मटकी, १३० क्विंटल ८६ किलो हरभरा असे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून हे वाटप करण्यात आले. दरम्यान, याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी पालकांना पोषण आहाराचा वापर योग्य पद्धतीने करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Distribution of nutritious food to 4 thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.