राज्य युवा संमेलनात प्रेरणा पुरस्कांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 01:16 PM2021-01-18T13:16:30+5:302021-01-18T13:16:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रेरणादायी काम करणा-यांचा सन्मान विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे ...

Distribution of Motivation Awards at the State Youth Conference | राज्य युवा संमेलनात प्रेरणा पुरस्कांचे वितरण

राज्य युवा संमेलनात प्रेरणा पुरस्कांचे वितरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रेरणादायी काम करणा-यांचा सन्मान विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे मत लेखक युसूफ पठाण यांनी  युवकमित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले.
राजमाता आई जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त युवकमित्र परिवार, नंदूरबार या  चळवळीमार्फत पुणे शहरात 'राज्यस्तरीय युवा संमेलन' आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवक  व युवतीचा यावेळी 'स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार'देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर हे होते तर उदघाटक म्हणून महाएनजिओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून विश्व जनकल्याण समितीच्या अध्यक्षा छायाताई भगत, ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण बागुल, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला गायकवाड, राज्य युवा परिषदेचे समन्वयक प्रवीण प्रधान, युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, उदयकाळ फाऊंडेशनचे अध्यक्ष मयूर बागुल यांच्यासह राज्यातील युवक युवती उपस्थित होते. अमर हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्तिक चव्हाण, भीमा शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of Motivation Awards at the State Youth Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.