शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

नवापुर तालुक्यात लाभार्थींना धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:47 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील तीन गावांमध्ये ७४ आदिवासी लाभार्थी कुटूंबांना आदिवासी विकास विभागाकडून मोफत धान्याचे वितरण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील तीन गावांमध्ये ७४ आदिवासी लाभार्थी कुटूंबांना आदिवासी विकास विभागाकडून मोफत धान्याचे वितरण करण्यात आले़ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला़यावेळी आमदार शिरीष नाईक, प्रकल्पाधिकारी वसुमना पंत, सहायक सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई, किरण मोरे, बी़एफ़वसावे, कार्यालयीन अधिक्षिका शिरसाठ उपस्थित होते़ आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याकडून १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत नवापुर तालुक्यातील नवागाव येथे ३०, आमलाण येथे २८ तर पाटी बेडकी येथे १६ लाभार्थी कुटूंबांना मोफत धान्य देण्यात आले़ कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेल्या या कुटूंबांना प्रत्येकी १० किलो मोफत गहू देण्यात आला़ नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने या योजनेंतर्गत कार्याक्षेत्रातील तीन तालुक्यात १ हजार ५०० कुटूंबांना मोफत धान्य दिले आहे़ येत्या काळात नंदुरबार, शहादा आणि नवापुर तालुक्यातील २ हजार कुटूंबांना धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी वसुमना पंत यांनी दिली़नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध गावांमधील ज्या आदिवासी कुटंूबांकडे शिधापत्रिका नाहीत अशा कुटूंबांना नोंदणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये या नोंदण्या होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक राहुल ईदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़दरम्यान तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव तालुक्यात आज ३७७ कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले आहे़ तळोदा प्रकल्प कार्यालयाकडूनही लाभार्थींची माहिती घेऊन त्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे़