शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

शिक्षण विभागातील सुधारणांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा शिक्षण विभागाचे कामकाज, प्रगती आणि करावयाच्या सुधारणा यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा शिक्षण विभागाचे कामकाज, प्रगती आणि करावयाच्या सुधारणा यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली़ खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते़खासदार डॉ़ हीना गावीत यांच्यासह आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एऩव्ही़ कदम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी़आऱरोकडे, डाएटचे प्राचार्य जालिंदर सावंत, शिक्षणाधिकारी डॉ़ किरण कुवर, शिक्षणाधिकारी डॉ़ युनूस पठाण यांच्यासह सर्व गट शिक्षण अधिकारी तसेच डाएटचे अधिव्याख्याता उपस्थित होते़ बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती तसेच या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषिक समस्या, नर्मदा काठच्या गावांमधील शाळांमध्ये शिक्षक न जाणे, शिक्षकांनी त्यांच्या जागी परस्पर गावातील इतर दहावी व बारावीतील शिक्षित विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य देणे, कामचुकार शिक्षक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली़बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयांच्या क्षमतांची चाचणी घे१न ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असणार नाही अशा शाळांबाबत चर्चा झाली़ या शाळांच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांची सभा घेऊन शिक्षकाला नियमानुसार कामकाज करण्याच्या सूचना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़शाळेत वृक्षारोपण, शाळेत विद्युत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या संदर्भातील माहिती असूक भरण्यावर भर देण्याचे आदेश देण्यात आले़ प्रसंगी जिल्हास्तरीय समस्या व शासन स्तरावरील समस्या यावरही चर्चा झाली़ आगामी दिशा समितीच्या बैठकीत जिल्हास्तरीय समितीचा निपटारा करुन सर्व शाळा आॅप्टिकल फायबर केबलने जोडून नेटची व्यवस्था करुन शाळा डिजीटल करणार असल्याचे खासदार डॉ़ हीना गावीत यांपी बैठकीत सांगितले़सुमारे अडीच तास सुरु असलेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, बँक अकाउंट, शाळा बाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देणे, परत आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करुन घेणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला़ आकांक्षित जिल्ह्यासाठीच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित बांधकाम पूर्ण करणे आणि तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळा बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले़