शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात ठेकेदार व नगरसेवकांच्या वादाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या दहा दिवसात नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांसह दोन ठेकेदारांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह एका नगरसेवकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या दहा दिवसात नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील दोन अभियंत्यांसह दोन ठेकेदारांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह एका नगरसेवकाने फ्री स्टाईल मारहाण केल्याच्या तीन घटना घडल्या असून याप्रकरणी शहरात खमंग चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे टाळण्यात आले असले तरी अंतर्गत वाद अद्यापही शमला नसल्याचे समजते. तात्पुरता समझोता झाला असला तरी संभाव्य वादळापूर्वीची शांतता असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.शहरातील १३ प्रभागांमध्ये पालिका प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. कोट्यवधी रुपये खर्चाची ही विकास कामे असल्याने संबंधित ठेकेदाराकडून काही मलिदा मिळावा या अपेक्षेने तथाकथित समाजसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते, पुढारी व नगरसेवक यांच्याकडून संबंधित कामे करणाºया ठेकेदाराला अडविण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असली तरी त्या तुलनेत त्याचा दर्जा योग्य नसल्याने ही विकास कामे किती दिवस टिकतील याबाबत सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली असली तरी दर्जा कसाही असो आमचे काय? असा आविर्भाव काही महाभागांनी घेतला असल्याने शहरात विकास कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेकेदाराने संबंधितांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी फ्री-स्टाईल हाणामारी झाली असली तरी या प्रकरणात पोलीस ठाण्यापर्यंत जाऊनही पोलिसांत कुठलीही फिर्याद दोन्ही गटातर्फे केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पालिका आवारासह शहरातील प्रमुख चौकात या घटनेची खमंग चर्चा सुरू आहे. बांधकाम विभागाशी संबंधित पालिकेतील शासकीय ठेकेदाराशी व पालिकेच्या अभियंत्याची गेल्या शुक्रवारी संभाजीनगर परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांची हमरीतुमरी अरेरावी झाली. अरेरावीपासून सुरू झालेले प्रकरण थेट हाणामारीपावेतो आले. यात पालिकेच्या बांधकाम अभियंत्यांना दिवसाढवळ्या मारहाण झाल्याची घटना घडली. यानंतर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले. मात्र तेथे मध्यस्थी करण्यात आल्याने कुठलीही फिर्याद नोंदविली गेली नाही.असाच काहीसा प्रकार नगरपालिका इमारतीत चार दिवसांपूर्वी घडला. एका ठेकेदाराचा बांधकाम अभियंत्याशी मोठा वाद झाला. शाब्दीक वादाचे रूपांतर हाणामारीत घडले. संबंधित ठेकेदाराला काही कर्मचाऱ्यांनी चांगलीच मारहाण केली. मात्र एका जबाबदार जिल्हा पदाधिकाºयाने मध्यस्थी केली व प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत जाऊ न देता आपसात समझोता घडवून आणण्यात आला. अखेर संबंधित ठेकेदाराने माफीनामा लिहून दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.शनिवारी रात्री जुन्या पोस्टगल्ली भागात अशीच घटना घडली असून यात संबंधित ठेकेदारास एका नगरसेवकानेच मारहाण केल्याची चर्चा पुढे आली आहे. याठिकाणी पालिकेतर्फे रस्त्याचे काम केले जात आहे. रात्रीच्यावेळी काम सुरू असताना प्रभागातील नगरसेवक येतो सुरुवातीला शाब्दिक चकमक होते. त्यानंतर लागलीच संबंधित ठेकेदाराला मारहाण होते. शनिवारी रात्री ही घटना घडली असली तरी त्याचे पडसाद रविवारी दिवसभर शहरात उमटत होते. याप्रकरणीही संबंधित ठेकेदाराकडून पोलिसात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. रस्त्याच्या कामात अनियमितता होत असल्याने ठेकेदाराशी वाद झाला, अशी भूमिका घेणाºया नगरसेवकाने अनियमित कामाबाबत पालिका प्रशासनाकडे कुठलीही तक्रार दिलेली नाही. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे या घटनेतही आपआपल्या स्तरावरून समझोता झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान, गेल्या १० दिवसांपासून नगरसेवक व ठेकेदार यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांनी लक्ष घालून हा वाद मिटविण्याची अपेक्षा सुज्ञ जनतेतून व्यक्त होत आहे.पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डांबरीकरणाची कामे अपूर्ण गटारी पूर्ण करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराकडून रात्रंदिवस काम केले जात आहे. ही कामे पूर्ण झाली नाही तर पाऊस पडल्यानंतर अपूर्ण असलेल्या कामाचा खर्च हा वायफळ ठरण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनही कामे कशी पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष ठेवत आहे. अशा परिस्थितीत गेल्या दहा दिवसात घडलेल्या या तीन घटना व त्यामागील घटनाक्रम हा शहरात खमंग चर्चेचा विषय झाला असून आता यावर गांभीर्याने ठोस कारवाई करण्याची गरज आहे. पालिका वतुर्ळात सुरू असलेली ही मारहाणीची चर्चा शहरातील प्रमुख चौकात होत आहे. पालिकेशी संबंधित या घटनेप्रकरणी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी दखल घेऊन घटनेची चौकशी करून चर्चेला पूर्णविराम देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.