शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णत: संचारबंदीचे ...

शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णत: संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर लागलीच ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णत: संचारबंदीचे निर्देश दिले आहेत. यात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यान, या काळात नागरिकांनी घाबरून न जाता घरीच राहणे पसंत करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी औषधांची दुकाने, रुग्णालये पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. दूध वितरकांना सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेस दूध वितरणास परवानगी राहणार आहे. तसेच किराणा आस्थापना सकाळी सहा ते ११ या वेळेत सुरू राहण्यास परवानगी राहणार असल्याने नागरिकांनी अतिरिक्त साठा घरात साठवू नये. बाजारात सामान अथवा वस्तू घेण्यासाठी गर्दी करू नये. आवश्यक तेवढाच सामान खरेदी करावा. कामानिमित्त घराबाहेर निघताना मास्क परिधान करावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, दूध, भाजीपाला, किराणा आदी तत्सम वस्तूंचा घरपोच सेवेस प्राधान्य द्यावे, शहरातील काही दुकानदारांनी घरपोच सामान पोहोचविण्याची प्रक्रिया अमलात आणलेली आहे. बाजारात प्रत्यक्ष वस्तू खरेदी करण्यासाठी न जाता फोनवर अथवा संबंधित दुकानांशी संपर्क साधून घरपोच सामान मागविण्यास प्राधान्य द्यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.