शिस्तभंगाची नोटीस पक्षाचे कार्याध्यक्ष नाही, तर प्रतोद देतात- चौघा सदस्यांचे पक्ष नेतृत्वाला उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:07+5:302021-06-22T04:21:07+5:30

आमचा परिवार काँग्रेसचा पाईक असून, जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची सेवा करत आलेला आहे. म्हणूनच आम्ही निवडून येतो. नाही तर जिल्हा ...

Disciplinary notice is not given by the working president of the party, but by the party-representatives. | शिस्तभंगाची नोटीस पक्षाचे कार्याध्यक्ष नाही, तर प्रतोद देतात- चौघा सदस्यांचे पक्ष नेतृत्वाला उत्तर

शिस्तभंगाची नोटीस पक्षाचे कार्याध्यक्ष नाही, तर प्रतोद देतात- चौघा सदस्यांचे पक्ष नेतृत्वाला उत्तर

आमचा परिवार काँग्रेसचा पाईक असून, जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची सेवा करत आलेला आहे. म्हणूनच आम्ही निवडून येतो. नाही तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवडणूक किती कठीण आहे, याचा अनुभव आपल्यालासुद्धा आहे. आपण भावनेच्या भरात व कुणाच्यातरी सांगण्यावरून नोटीस दिलेली दिसते. परंतु आम्ही कुठलेही पक्षविरोधी कृत्य केलेले नाही, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. आज निष्ठावान लोकांची काँग्रेस पक्षात कमतरता असल्याने पक्षाचे नेतृत्व विविध पक्षांतून आलेली मंडळी करीत आहेत, याची खंत देखील मनात आहे.

जनतेने निवडून दिलेल्या व सदस्य रद्द झालेल्या सदस्यांच्या गटांनाही निधी द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु आपल्याला आमची मागणी पटली नाही व आपण आम्हाला सल्ला दिला की, आमची मागणी विचित्र व सद्‌विवेकबुद्धीला न पटणारी, अव्यवहार्य आहे. यावरून आपण ११ जिल्हा परिषद सदस्यांचा मतदार संघावर एकप्रकारे अन्याय करीत आहात, असे आम्हाला वाटते. पक्षाची भूमिका अशी स्वार्थी कधीही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण आम्हाला दिलेल्या नोटिसीचे हेच उत्तर गृहित धरून आपली नोटीस निकाली काढावी, असेही या नोटिसीच्या स्पष्टीकरणात सदस्यांनी म्हटले आहे.

Web Title: Disciplinary notice is not given by the working president of the party, but by the party-representatives.