शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतक:यांना अवकाळीची भरपाई बँक खात्यावर देण्याची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े या पिकांसाठी शासनाने भरपाई जाहिर करुन नंदुरबार जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यातील 1 कोटी रुपयांचा निधी दोन दिवसांपूर्वी पोहोचता केला होता़ या निधीचे वाटप बुधवारपासून सुरु झाले असल्याची माहिती देण्यात आली आह़े कोरडवाहू शेतीपिकांसाठी शासनाने 8 हजार रुपये तर बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहिर केली आह़े ही मदत वर्ग करण्यासाठीची कारवाई जिल्हा प्रशासनाने बुधवारी सुरु केली होती़ यांतर्गत नंदुरबार तालुक्याला 4 लाख 50 हजार, नवापुर 27 लाख 21 हजार 500, शहादा 27 लाख 21 हजार 500, तळोदा 40 हजार, अक्कलकुवा 27 लाख 21 हजार 500 आणि धडगाव तालुक्यासाठी 27 लाख 21 हजार 500 रुपये असे एकूण 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे वितरण करणे सुरु झाले आह़े जिल्ह्यात 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या  पंचनाम्यातून समोर आले होत़े यात 5 हजार 788 हेक्टर कोरडवाहू तर 22 हेक्टर क्षेत्र हे बागायती आह़े या संपूर्ण नुकसानीसाठी शासनाकडे 3 कोटी 8 लाख 23 हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता़ त्यापैकी 1 कोटी 13 लाख रुपयांचे पहिल्या टप्प्यातील अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होत़े बुधवारी तालुकानिहाय तहसीलदारांना पत्र देऊन रकमेचे वाटप सुरु करण्यात आले आह़े तलाठींकडे कागदपत्रे देऊन बँकांची संपूर्ण माहिती देणा:या शेतक:यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान गुरुवारी सकाळपासून तलाठींकडून कागदपत्रे पडताळणी करण्यासह बँक खात्यांची माहिती अपडेट करण्याचे काम सुरु करण्यात आल्याने शेतकरी त्यांच्याकडे धाव घेत होत़े जिल्ह्यात पहिल्यात टप्प्यात सर्वच शेतक:यांच्या खात्यावर मदत पोहोचती करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आह़े