कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:36 PM2021-01-22T12:36:26+5:302021-01-22T12:36:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या शहादा आणि नंदुरबार येथे सीसीआय अर्थात काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडियाने सुरु केलेल्या ...

Despite the open market attack on cotton procurement, CCI has crossed Rs 2 lakh | कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या शहादा आणि नंदुरबार येथे सीसीआय अर्थात काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडियाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रांवर यंदा दोन अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण झाली आहे. गावखेड्यावर खाजगी व्यापारी सीसीआयच्या दरांच्या बरोबरीने दर देत असतानाही दोन्ही केंद्रात मोठी आवक झाली आहे. 
२०१९ च्या खरीप हंगामातील कापूस खरेदी जून २०२० पर्यंत सुरु होती. यातून शेतक-यांनी गेल्या खरीप हंगामातही पुन्हा कापसावर भिस्त ठेवत १ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड केली होती. यातून मोठ्याप्रमाणावर उत्पादन येणार अशी शक्यता असताना कापसावर लाल्याचे आक्रमण झाले होते. यातून सावरत शेतक-यांनी हाती असलेला कापूस वेचणी करत सीसीआयकडे नोंदणी केली होती. नंदुरबार तालुक्यात साधारण साडेसात हजार तर शहादा तालुक्यात साडेआठ हजार शेतक-यांनी नोंदणी करुन कापूस विक्री केली होती. नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या खरेदीला वेळोवेळी ब्रेक लागूनही जानेवारीच्या मध्यातच शहादा आणि नंदुरबार केंद्राने अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण केली आहे. 
दरम्यान खाजगी व्यापारी सीसीआय देत असलेल्या ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रूपयांपर्यंत दर देत असतानाही गेल्या काही वर्षात खेडा खरेदीत झालेल्या फसवणूकीमुळे शेतकरी सीसीआयकडेच कापूस देत आहेत. यातून केवळ अडीच महिन्याच्या काळात ही खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 
नंदुरबार येथील केंद्रावर गेल्या दोन दिवसांपूर्वीच एक क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतक-यांचा कापूस विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने शेतकरी याठिकाणी धाव घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. शहादा तालुक्यात मात्र या उलट  स्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांना संपर्क करत खेडा खरेदी करणारे थेट घरापर्यंत जावून मालाची उचल करु लागल्याने शहादा तालुक्यातील कापूस खरेदीचा हंगाम आवरता झाल्याचे बोलले जात आहे. यातच खेतिया बाजारातही कापसाचे दर वाढले असल्याने शहादा तालुक्यातील शेतक-यांना तिकडची वाट धरली आहे. 

   नंदुरबार १ लाख पार 
 नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रात एक लाख २०० क्विंटल कापूस आवक आजअखेरीस झाली आहे. 
 या केंद्रात ५ हजार ८६० रूपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला गेला.
नंदुरबार सह धुळे जिल्ह्यातून येथे कापूस आवक झाली होती. 

   शहाद्यात आवक थंड 
 शहादा बाजार समिती सीसीआयचे केंद्र चालवते. याठिकाणी आतापर्यंत १ लाख ५८ हजार क्विंटल कापूस आवक झाली आहे. 
 परंतू तूर्तास आवक थांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यात खाजगी व्यापारी ५ हजार ७०० रूपयांपर्यंत दर देत असल्याने ही स्थिती आहे. 

जिनिंग उद्योगाला मिळतोय बुस्टर  
 लाॅकडाऊनमुळे गेल्या हंगामात नुकसान सोसणा-या जिनिंग उद्योगाला यंदा कापूस खरेदीमुळे बुस्टर मिळाले आहे. नंदुरबार बाजार समितीकडून सीसीआयसोबतच तीन परवानाधारक व्यापा-यांना कापूस खरेदीस मुभा दिली गेली आहे. त्यांच्याकडेही कापूस येत असल्याने त्याचे जिनिंग होवू जिल्ह्यातून कापूस गाठींची निर्यात सुरु झाली आहे. 

Web Title: Despite the open market attack on cotton procurement, CCI has crossed Rs 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.