शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

पुरबाधा टाळण्यासाठी नाला खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : मागील तीन वर्षांपासून चिंचपाडा ता. नवापूर येथील १७ घरांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरुन घरांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : मागील तीन वर्षांपासून चिंचपाडा ता. नवापूर येथील १७ घरांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरुन घरांचे नुकसान होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तेथे नाला खोलीकरणच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.चिंचपाडा हे गाव झोडंबी तथा मसावट नाल्यावर वसले असून या नाल्याला काही उपनाले देखील आहे. या सर्व नाल्यांचे पाणी एकत्र झाल्यास मोठ्या नाल्यातील पाणी थेट नागरी वसाहतीत शिरते. त्यात घरांचे नुकसान होऊन संसार उघड्यावर येतात. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत चिंचपाडा येथील नागरिकांमध्ये पुराची भिती निर्माण होते. अशी परिस्थिती मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात उद्भवत आहे. मागील पावसाळ्यात १७ घरांमध्ये नाल्याचा पुर शिरल्याची नोंद महसुल विभाग व ग्रामपंचायतीकडे करण्यात आली, त्यात नुकसानग्रस्त कुटुंबियांचा संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. तर २०१८ व २०१७ मधील पावसाळ्यात प्रत्येकी नऊ घरांमध्ये पुराचे पाणी शिरत त्यांचेही मोठे नुकसान झाले.तीन वर्षांपासून होणाऱ्या या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांसह तेथील नारिकांनी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यात नागरिकांनी गावातील मुख्य नाल्याचे खोलीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत संबंधित विभागामार्फत गावातील नाल्याचे खोलीकरणसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाकडून मंजूरी देखील देण्यात आली. शिवाय १८ लाखाची निधी जिल्हा वार्षिक नियोजनमधून उपलब्ध करुन देण्यात आला. निधीही उपलब्ध करुन दिल्यामुळे आमागी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत नाला खोलीकरणचे काम हाती घेण्यात आले आहे.शासनामार्फत नाल्या खोलीकरणचे काम सुरु केल्यामुळे पुढील पावसाळा फारसा संकटाचा राहणार नसल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. शिवाय नाला खोल राहिल्यास काही प्रमाणात पुरपरिस्थितीवर मात देखील करता येईल, असे मतही तेथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गावात उद्भवणारी पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शसनामार्फत नाला खोलीकरणचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम एक कि.मी. व ८०० मिटरवर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण चिंचपाडा गाव आगामी पावसाळ्यात सुरक्षीत राहतील अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.मुख्य मसावट नाल्याला अनेक उपनाले असल्यामुळे मुख्य नाल्याची खोली व रुंदी आवश्यकतेनुसार ठेवण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेमार्फत सांगण्यात येत आहे. तर नाला साफसफाईची अन्य सर्व कामेही तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.