शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी येथे घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने गटारी, रस्ते व इतर समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला.निवेदनात म्हटले आहे की, जुन्या गोसावी वाडय़ात अनेक वर्षापासून सांडपाणी वाहून नेणारी गटार नादुरुस्त स्थितीत असल्याने या गटारीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. या सांडपाण्यामुळे ठिक ठिकाणी डबके साचले असून, डासांचे प्रमाणात वाढ झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गोसावी वाडय़ात ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांनी याठिकाणी दगड विटा ठेवून पायवाट तयार केली होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता येथील नागरिकांनी स्वखर्चाने रस्ता तयार करून घेतला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गटारी पाण्याने भरल्या गेल्याने हे सांडपाणी नागरिकांच्या घरात जात असल्याने नाराजी व्यक केली जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने बाजार समिती परिसरात पाण्याची डबके साचल्यामुळे वराहांनी धुमाकूळ घातला असल्याने याठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. यावेळी नागरिक व दुकानदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देण्यात आले आहे.