शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा बचावची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन भरपाई देण्याची मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन भरपाई देण्याची मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे करण्यात आली़ सोमवारी नर्मदा बचाव आंदोलनच्या कार्यकत्र्यानी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केल़े यावेळी नर्मदा बचावतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, नर्मदा खो:यातील 33 गावे व 14 पुनर्वसन वसाहतीत पुनर्वसन पूर्ण झाले नसताना बेकायदेशीरपणे धरणात पाणी साठवले गेल़े जून 2019 पासून राज्यात मुसळधार पाऊस, अतीवृष्टी व निकासाची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील बाधितांची शेतीही बुडाली़ अनेक शेतक:यांची शेती वाहून गेली़ तसेच अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आह़े कालांतराने अवकाळीमुळेही पिकांची हानी झाली आह़े यामुळे जिल्ह्यातील पावसाळ्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे योग्य त्या पद्धतीने करुन योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे नियोजन करावे, आरसीईपी कराराला पुढे जाऊ देऊ नये, देशातील अर्थव्यवस्था शेती व ग्रामीण भागावर विपरीत परिणाम होणार आह़े यातून आसीईपी करार त्वरीत रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे हे जलदगतीने करुन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, सरदार सरोवराची पातळी सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 138़68 मीटर पूर्ण भरल्यामुळे शेकडो घरे टापू, बुडीतात आली व शेकडो हेक्टर शेती पाण्यात गेली आह़े त्यापैकी ज्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ त्यांना भरपाई तसेच पंचनामे पूर्ण नसल्यास ते करण्याची आदेश देण्याची मागणी करण्यात आली आह़े यावेळी कांतीलाल पावरा, किरसिंग वसावे, ओरसिंग पटले, चेतन साळवे, लतिका राजपूत, कृष्णा पावरा, सिमजी पावरा, मान्या पावरा, हिरालाल पावरा, लालसिंग वसावे, कालुसिंग पाडवी यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होत़े