कोरोनाबाबत खापर येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर बंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:51 IST2020-03-21T11:51:23+5:302020-03-21T11:51:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर भागात खाजगी प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये नेहमीच प्रवासी कोंबून वाहतुक होते. ...

Demands ban on illegal passenger traffic in Khapar regarding Corona | कोरोनाबाबत खापर येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर बंदीची मागणी

कोरोनाबाबत खापर येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर बंदीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर भागात खाजगी प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांमध्ये नेहमीच प्रवासी कोंबून वाहतुक होते. कोरोनाबाबत घेण्यात येणाºया प्रतिबंधात्मक उपाययोनांर्गत बंदी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात असून एसटी महामंडळाने देखील एका सिटवर एक प्रवासी असे धोरण घेतले आहे. या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी देखील केली जात आहे. मात्र याला खाजगी प्रवासी वाहने अपवाद ठरत असून एका वाहनात ३० ते ४० प्रवासी कोंबुन धोकेदायक प्रवासी वाहतुक सुरू आहे. मात्र आरटीओ यंत्रणा व वाहतुक शाखा केवळ बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे.
देशात कोरोनाच्या पार्शभुमीवर सर्वत्र आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतांना सर्वत्र स्वच्छता व काळजी घेतली जात आहे. गर्दी होणार नाही अशी दक्षता घेतली जाते आहे. मात्र अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेली प्रवासी वाहने प्रवाश्यांची दाटीवाटीने गर्दी प्रवासी वाहतुक करीत आहेत. तालुक्यात गुजरातेतूनही मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची वाहतूक होत असून आजाराचा धोका बळावत असून खाजगी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध लावणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Demands ban on illegal passenger traffic in Khapar regarding Corona