शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

निवेदनात म्हटले आहे की, शहादा शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता तात्कालिन पोलिस निरीक्षकांनी शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये १६ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ...

निवेदनात म्हटले आहे की, शहादा शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता तात्कालिन पोलिस निरीक्षकांनी शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये १६ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे स्थापित केले होते. मात्र अपवाद वगळता सर्वच यंत्रणा बंद आहे. सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी रात्रीची संचारबंदी तसेच प्रत्येक शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यातून शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नागरिक व व्यापारी भयभीत झाले आहेत. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरू राहिल्यास चोरांचा माग काढण्यास पोलीस प्रशासनाला मोठी मदत होणार आहे. तसेच शालेय विद्यार्थिनींना शाळेच्या आवाराबाहेर व बसस्थानकात छेडखानीच्या घटनांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. मात्र भीतीपोटी तक्रार करण्यास त्या धजावत नाहीत. या सर्वांचा विचार करता शहरातील सर्व सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरू करणे त्यासोबत शहरातील सर्व शाळांच्या आवाराच्या बाहेर असलेल्या चौकात आणि बसस्थानक परिसरात किमान दोन सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरूणांवर वचक बसण्यासह मुलींना सुरक्षितता प्रदान होईल. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा करण्यात आली आहे. निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे, तालुकाध्यक्ष प्रा.डी.सी. पाटील, कार्याध्यक्ष डॉ.खलील शाह, सचिव प्रा.विजय येवले, खजिनदार किन्नरी सोनार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.