शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघातर्फे एक हजार टन खताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतकरी सहकारी संघाच्या तालुक्यातील सहा सेंटरमधून युरिया खताचे वितरण सुरू आहे. खताची खरेदी करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकरी सहकारी संघाच्या तालुक्यातील सहा सेंटरमधून युरिया खताचे वितरण सुरू आहे. खताची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी सकाळपासूनच गर्दी करीत आहेत. संघाच्यावतीने एक हजार ते एक हजार २०० टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून, शासनाने वेळेवर पुरवठा करावा अशी मागणी अध्यक्ष बी.के पाटील यांनी केली आहे.सध्या सर्वत्र शेतशिवारामध्ये खरीप हंगामाची तयारी करताना शेतकरी, शेतमजुरांची लगबग दिसून येत आहे. पिकांची पेरणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. जवळपास तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्याचे चित्र आहे. थोड्याफार प्रमाणावर पेरण्या अजूनही बाकी आहेत. जून महिना लोटला असला तरीही अद्यापपर्यंत म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. मागील १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले होते.परंतु आता बळीराजाला आशा आहे, ती फक्त दमदार पर्जन्यवृष्टीची. जून महिन्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे या महिन्यात तरी दमदार पर्जन्यवृष्टी व्हावी अशी शेतकºयांना आशा लागून राहिलेली आहे. शेजारच्या धुळे, जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातही दमदार पाऊस बरसावा यासाठी बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.गेल्या १० ते १५ दिवसांपूर्वी तालुक्यात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी १५ ते २० मिनिटे चांगल्या पावसानंतर वरूणराजाने विश्रांती घेतली. मंगळवारी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेती साहित्य खरेदी करीत असल्याचे दिसून आले. शेतात पेरणी झाली असल्याने खतांच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अनेक कृषी केंद्रांवर खत खरेदीसाठी शेतकºयांना रांगा लावल्या होत्या.शहरातील परदेशीपुरा भागात असलेल्या शेतकरी सहकारी संघाकडून सध्या युरियाचे वाटप करण्यात येत आहे. या ठिकाणी सकाळपासूनच शेतकरी व शेतमजुरांची खत घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास महिलांची लक्षणीय गर्दी उसळली होती. शेतकरी सहकारी संघाच्या नंदुरबार, रनाळे, कोपर्ली, खोंडामळी, ईसाईनगर या शेतकरी सहकारी संघाच्या सहा युनिटमधून युरियाचे वाटप करण्यात येत आहे.शेतकरी सहकरी संघाच्या सहा युनीट मधून शेतकºयांना युरिया व मिश्र खतांचे वाटप करण्यात येत आहे. सध्या ४०० टन युरिया साठा उपलब्ध झाला आहे. दररोज शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच शेतकºयांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच खतांचा पुरवठा करण्यात येत असतो. येणाºया प्रत्येक शेतकºयाला युरिया खताच्या पाच पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे. रनाळे सेंटर येथे शेतकºयांची जास्त गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी दोनच पिशव्यांचे वाटप सुरू आहे. येणाºया कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर खतांची मागणी वाढणार आहे. त्यासाठी शेतकरी सहकारी संघाकडून एक हजार ते एक हजार २०० टन खतांची मागणी करण्यात येणार असून, शासनाने वेळेवर पुरवठा करावा, अशी अपेक्षा शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील यांनी केली.