शहादा पालिकेतर्फे दोन रुग्णवाहिका व शववाहिनीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST2021-04-21T04:30:34+5:302021-04-21T04:30:34+5:30

नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी या रुग्णवाहिका नंदुरबार जिल्हा रुग्णालयापर्यंत सेवा देतील. मोहदा शिवारात नगरपालिकेमार्फत शंभर खाटांचे काेविड सेंटर उभारले ...

Dedication of two ambulances and hearse by Shahada Palika | शहादा पालिकेतर्फे दोन रुग्णवाहिका व शववाहिनीचे लोकार्पण

शहादा पालिकेतर्फे दोन रुग्णवाहिका व शववाहिनीचे लोकार्पण

नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी या रुग्णवाहिका नंदुरबार जिल्हा रुग्णालयापर्यंत सेवा देतील. मोहदा शिवारात नगरपालिकेमार्फत शंभर खाटांचे काेविड सेंटर उभारले जात आहे. काेराेनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल, त्यांचे औषधी उपचार होतील. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे, असेही मोतीलाल पाटील यांनी सांगितले.

एकंदरीत दोन रुग्णवाहिका व शववाहिनी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय दूर होणार आहे. सध्या काेराेनाचा संसर्ग व रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले होते.

Web Title: Dedication of two ambulances and hearse by Shahada Palika