शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पाडवी यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST

यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, ...

यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे शक्य होईल, असा विश्वास ॲड. पाडवी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सांगितले की, रुग्णवाहिकांमुळे रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेता येईल. कोरोनाबाधितांनादेखील चांगली सुविधा उपलब्ध होईल. आपल्या आमदार निधीतून ६ आणि आमदार नाईक यांच्या आमदार निधीतून ७ रुग्णवाहिका मिळणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल. सर्व मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले प्रयत्न करीत आहेत. आमदार राजेश पाडवी यांच्या आमदार निधीतूनदेखील यापूर्वी ४ रुग्णवाहिका घेण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

जिल्ह्यासाठी कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून ४९ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७ रुग्णवाहिका यापूर्वी शासनातर्फे प्राप्त झाल्या असून इतर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सामाजिक उत्तरदायित्व निधी व विविध संस्थांकडून प्राप्त झाल्या आहेत. मंगळवारी प्राप्त रुग्णवाहिका कोपर्ली, मोरंबा, सुलवाडा, कुसुमवाडा, झामणझर, काकडदा, चुलवड येथील आरोग्य केंद्रांसाठी उपयोगात आणल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर ‘ॲम्ब्युलन्स ट्रॅकिंग सिस्टीम’ विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील रुग्णवाहिकेची माहिती आणि चालकाचा क्रमांक तत्काळ मिळणार आहे.