शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अश्वस्थामा यात्रेत दारुबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : दिवाळीच्या कालावधीत साजरी अश्वस्थामा यात्रोत्सवात  सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अस्तंबा ता.धडगाव येथे  पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : दिवाळीच्या कालावधीत साजरी अश्वस्थामा यात्रोत्सवात  सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अस्तंबा ता.धडगाव येथे  पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची यात्रापूर्व बैठक घेण्यात आली. यावेळी यात्रेत दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.अस्तंबा येथे अश्वस्थामा ऋषी महाराजांची एकमेव यात्रा भरविली जात असल्यामुळे यात्रेला येणा:या भाविकांची संख्या अधिक असते. या यात्रेत भाविकांना कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक अस्तंबाच्या दोन्ही युवा पोलीस पाटलांनी घडवून आणली. बैठकीत पोलीस निरीक्षक डी.एस.गवळी, अस्तंबा फॉरेस्टचे पोलीस पाटील अंबालाल वसावे, अस्तंबा महसुलचे पोलीस पाटील मानसिंग वळवी, पोलीस कर्मचारी मधुकर राऊत, अजय कोळी, तुकाराम वसावे, अभिमन्यू गावीत, वनसिंग वळवी, फोज्या वळवी, पोपटा वसावे आदी उपस्थित होते. दारुमुळे शांतता व सुरक्षा व्यवस्था ढवळून निघते, गावात दारुबंदी असली तरी यात्रेत बाहेरुन दारु विक्रीसाठी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी या बैठकीत दारुबंदीचे कठोर निर्णय घेण्यात आले आहे. यासाठी पोलीस प्रशासन व तेथील ग्रामस्थ तत्पर झाले असून यात्रेसंबंधित सर्व निर्णय दोन्ही यंत्रणेमार्फत संयुक्तपणे घेतले जाणार आहे. बैठकीत घेतलेले निर्णय यात्रा संपेर्पयतच नव्हे तर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाविकांना शांततेत व सुरक्षीत यात्रा करता येणार आहे. शिवाय तेथे नेहमी सलोख्याचे वातावरण राहणार      आहे. अस्तंबा येथे जाण्यासाठी तोन प्रमुख मार्ग आहेत. त्यात धडगावमार्गे कालीबेल, असलीवरुन जाता येते. अक्कलकुवाकडून जाणा:या यात्रेकरुंना डाब, जमाना व असलीवरुन जाता येणार आहेत. तर तळोदा तालुक्यातूनही तेथे पोहोचता येते. परंतु या मार्गाने जाणा:या भाविकांना काही वेळ पायी चालावे लागणार आहे. त्यामुळे बहुतांश भाविक हे धडगाव अथवा अक्कलकुवा मार्गेच जाणार आहे.

यात्रेनिमित्त सोंगाडय़ांचे कार्यक्रम दि. 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवस राहणार आहे. याशिवाय होब घेऊन येणा:यांकडून असे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा गोंधळ होऊ नये, यासाठी होब यात्रेकरुंना आधी कार्यक्रमांची पडताळणी करावी लागणार आहे, कार्यक्रम यात्रा संयोजकांकडून मिळणा:या सूचना व वेळेतच घेता येणार आहे. तसा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.