शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

्रसातबा:यावर कर्जाचा बोजा अन् मनात नैराश्याच्या ओङयातूनच संपवलं जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:49 IST

जितेंद्र गिरासे ।  लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : विनाअनुदानित संस्थेत काम करुनही भागेना, म्हणून मग गावात असलेली वडीलोपाजिर्त शेती ...

जितेंद्र गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : विनाअनुदानित संस्थेत काम करुनही भागेना, म्हणून मग गावात असलेली वडीलोपाजिर्त शेती सुरु केली़ यातही अपयशालाच हात लागला़ यश येईल म्हणून उभारी धरली़ यंदा पाऊस आला पीक तरारलं परंतू अवकाळीने वाहून गेलं़ यातून सातबा:यावर कर्जाचा आणि मनात नैराश्याचं ओझं बळावत गेल्याने अखेर शेतक:याने स्वत:ला संपवल्याची ह्रदयद्रावक घटना  कोठली त़सा़ ता़ शहादा घडली़ प्रफुल्ल राजधर पाटील असे शेतक:याचे नाव असून त्याच्या आत्महत्येने शेतक:यांची मनस्थिती पुन्हा समोर आली आह़े कोठली त़सा ता़ शहादा येथील प्रफुल्ल पाटील यांनी रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्यानंतर ओला दुष्काळ अधोरेखित झाला आह़े वडीलोपाजिर्त 12 एकर शेतीची मालकी असलेल्या प्रफुल्ल यांचे शिक्षण डीएर्डपयत झाले होत़े विनाअनुदानित शाळेत काही काळ ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर त्याठिकाणी वेतन मिळत नसल्याने अखेर शेतीचा मार्ग पत्करला होता़ शहादा तालुका हा तसा प्रगतीशील शेतक:यांचा परिसर असल्याने आपलाही टिकाव लागेल हीच खात्री मनाशी होती़ यातून वेळावेळी शेती करताना ज्येष्ठांचा सल्ला घेत शेतीला सुरुवात केली़ प्रारंभी जे पिकलं, ते मिळेल त्या भावात विकून ‘अॅडजस्ट’ करण्याचा प्रयत्न केला़ परंतू दरवर्षी उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ न बसल्याने मग कर्जाचा डोलारा वाढायला लागला़ सातबा:यावर एकाच राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज वाढून लाखांच्या घरात गेलं़ यातून नैराश्य येऊन विमनस्क अवस्था झाल्याने कुटूंबियांनी समजूतही काढली़ यातून सावरत पुन्हा शेतीला सुरुवात केली़ यंदा स्थिती चांगली असल्याने कर्ज मिटणार अशी आशा असताना अवकाळीने पुन्हा दगा दिल्याने नैराश्य टोकाला गेल़े त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांचे कुटूंबिय पूर्णपणे सुन्न झाले होत़े आई-वडीलांचा आक्रोश, पत्नी, 10 वर्षाची मुलगी आणि 3 वर्षाचा नकळता मुलगा यांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रु मावत नव्हत़े मयत प्रफुल्ल पाटील यांच्या वारसांची झालेली बिकट अवस्था पुढील काळात तरी संपणार का, असा प्रश्न शेतक:याच्या आत्महत्येनंतर उपस्थित होत आह़े