शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भोणेफाट्यावरील घरकूल वसाहतीत विजेअभावी अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संबंधित विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने येथील रहिवाशांना आकडा टाकून वीज घेण्याची वेळ आली ...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संबंधित विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने येथील रहिवाशांना आकडा टाकून वीज घेण्याची वेळ आली आहे. यामुळे वीज मीटर ग्राहक व येथील रहिवाशांमध्ये अनेकदा या कारणावरून वाददेखील उद्‌भवत आहेत. नंदुरबार शहराजवळच असलेल्या भोणे फाट्यावरील घरकूल वस्ती सर्व्हे नंबर ३०० मध्ये दोन वर्षांपासून वीजपुरवठा नसल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास विंचू, साप आदी विषारी प्राणी निघत असल्याने रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या घरकूल वसाहतीला लागून असलेल्या वीज तारांवर येथील रहिवाशांना आकडा टाकून रात्र काढावी लागत आहे. विद्युत तारांवर आकडा टाकत असल्याने एकाच विद्युत रोहित्रावर अधिक भार होत असल्याने त्या परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून या कारणावरून मीटरधारक ग्राहक व घरकूलमधील रहिवाशांमध्ये अनेकदा वाद निर्माण होत आहेत. मंगळवारी येथील रहिवाशांनी वीज तारांवर आकडा टाकल्याने मीटरधारक ग्राहक व येथील रहिवाशांमध्ये या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. वेळीच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी येथील रहिवाशांनी विविध समस्या मांडल्या. वीजपुरवठा नसल्याने रात्र अंधारातच काढावी लागते. वीजपुरवठा व्हावा यासाठी येथील रहिवाशांनी नगरपालिका व महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनाही वेळोवेळी निवेदन देऊनही याकडे संबंधित विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

भोणे फाट्यावरील घरकूल वसाहतीत सध्या १३० हून अधिक कुटुंब रहिवासी आहेत; मात्र या दुर्लक्षित घरकूल वसाहतीत विविध समस्या असून त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यावेळी भिका महादू बाबरे, गुड्डू सैयद नुरअली, मनीषा राजेंद्र गुरव, हसनूरबी हमेतखाँ चिखलीकर, वर्षा नवनीत पाटील, मंगलाबाई माळी, शबानोबानो, सुभानखॉ, शेख आरिफ शेख अब्दुल, अकीमखा पठाण आदी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या आहेत.

वीज नसल्याने सण-उत्सव अंधारातच साजरे करावे लागतात. संबंधित वीज वितरण व नगरपालिकेला अनेकदा निवेदने दिली आहेत; मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. अंधार असल्याने आम्ही शेजारच्या कॉलनीतील विद्युत तारांवर आकडी टाकत असल्याने यामुळे विद्युत रोहित्रावर अधिकचा भार होत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे या परिसरातील ग्राहक व आमच्यात या कारणावरून वाद उद्‌भवत असतो. संबंधित विभागाने वेळीच वीजपुरवठा करावा.

-गुड्डू सैयद नुरअली, रहिवासी, भोणेफाटा घरकूल वसाहत